मुंबई : म्हाडाकडून घराची लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र एका आरोपीने म्हाडाच्या संकेतस्थळाशी मिळतेजुळते बनावट संकेतस्थळ बनवले आहे. ही बाब म्हाडा अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.दरवर्षाप्रमाणेच म्हाडातर्फे मुंबईतील ९९७ आणि अंध व अपंग प्रवर्गातील प्रलंबित ६६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १५ एप्रिल २०१५ ते १४ मे २०१५ या काळावधीत नागरिकांनी नोंदणी करायची आहे. तर आॅनलाइन अर्जासाठी २१ एप्रिल ते १८ मे २०१५ हा कालावधी आहे. मात्र म्हाडाच्या ँ३३स्र२://’ङ्म३३ी१८.ेँंंि.ॅङ्म५.्रल्ल या अधिकृत संकेतस्थळाप्रमाणेच एका आरोपीने ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी ६६६.ेंँंंि’ङ्म३३ी१८2015.्रल्ल हे संकेतस्थळ तयार केले. म्हाडा अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज भरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ संकेतस्थळाविरुद्ध गुन्हा
By admin | Published: April 21, 2015 12:56 AM