लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी (पुणे)/अहमदनगर : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आणि त्यांचे पती प्रशांत देसाई यांच्यासह सतीश देसाई, कांतिलाल उर्फ अण्णा गवारे व अनोळखी दोघे अशा सहा जणांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा (दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत) गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करीत दागिने, रोख रक्कम हिसकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय अण्णासाहेब मकासरे (वय ३१, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मारहाण, जातीवाचक शिवीगाळ करीत आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील १५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी, २७ हजार रुपये रोख, असा मिळून ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला, असे फिर्यादीत म्हटले आहे. २७ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास बालेवाडी येथील क्रीडासंकुलाजवळून फिर्यादी मकासरे त्यांच्या मोटारीतून तृप्ती देसाई यांच्याबरोबर जात होते. बालेवाडीजवळ तृप्ती देसाई यांचे पती प्रशांत यांच्यासह वरील चौघांनी मोटार आडवी लावून मकासरे यांना थांबविले. त्यांच्याकडील दोन मोबाइल काढून घेतले. त्यानंतर तृप्ती देसाईंसह वरील आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण केली. ‘आमच्या विरोधात गेलास तर महिलांना सांगून तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन,’ अशी धमकी तृप्ती देसाई यांनी दिली़या प्रकरणाशी संबंध नाहीहिंजवडी पोलीस ठाण्यात आपणाविरोधात कोणीतरी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचे समजले. पोलिसांकडून मात्र याबद्दल काही माहिती मिळाली नाही. मला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र असून, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार आहे.- तृप्ती देसाई, अध्यक्षा, भूमाता ब्रिगेड
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसार्इंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By admin | Published: July 07, 2017 3:57 AM