शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

कोल्हापुरच्या पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या एपीआयचा धिंगाणा

By admin | Published: June 04, 2016 3:23 AM

स्वत:च्या नातेवाईकांना मारहाण करुन पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या एपीआय अरूण धनावडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मुंबई : स्वत:च्या नातेवाईकांना मारहाण करुन पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या एपीआय अरूण धनावडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आपल्याला खोटया गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप धनवडे करत आहेत. विशेष म्हणजे या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी धनावडे यांना सेवेतून निलंबीत केले आहे. तसेच त्यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.वरळी पोलीस वसाहतीत राहण्यास असलेले धनवडे गुन्हे शाखेच्या युनीट तीनमध्ये कार्यरत आहेत. मे महिन्यात सुटी घेउन ते गडहिंग्लजच्या भडगाव येथील गावी गेले होते. धनवडे यांच्या म्हणण्यानुसार, २४ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास त्यांची पत्नी, मुलगी, सासू-सासरे, मेव्हणा भडगाव रेथील घरी आले. या सर्वांनी मिळून मला मारहाण केली. तसेच गावी घराच्या डागडुजीसाठी फंडातून काढलेले दहा लाख रूपये, दागिने घेउन सर्वजण निघून गेले. या घटनेची माहिती देण्यासाठी मी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गेलो. तेथे माझ्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेण्याऐवजी तेथील पोलीस निरिक्षक अवदुंबर पाटील यांनी मलाच ताब्यात घेतले. रात्री आठच्या सुमारास मला मारहाण केली. मारहाणीचा मोबाईलमध्ये आॅडीओ-व्हीडीओ शूट केला म्हणून रागाच्या भरात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून माझ्याविरोधात गुन्हा नोंद केला. या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री, पोलीस महांसचालक, मानव अधिकार आयोग, लोकायुक्त कार्यालयात लेखी तक्रार अर्ज दिल्याचे धनवडे सांगतात.गडहिंग्लज पोलिसांनी धनवडेंचा आरोप फेटाळून लावला. पोलीस ठाण्याचे प्रमुख अवदुंबर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार धनवडे वरळी कॅम्पमध्ये राहातात. वैयक्तिक व घरगुती कारणावरून कॅम्पमधील अन्य पोलीस कुटुंबांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. हे कारण वैयक्तिक असून, तपासाशी निगडीत नसल्याने सांगता येणार नाही. मात्र याच कारणावरून त्यांचे कुटुंबिय २४ मे रोजी भडगावात आले होते. सायंकाळी त्यांनी भिंतीवर डोके आपटून घेत स्वत:ला जखमी करून घेतले. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फोडले. त्यांनंतर मात्र त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस ठाण्यात येण्याआधी मी धनवडेंना ओळखत नव्हतो. मात्र एक पोलीस अधिकारी म्हणून त्रांना समजावून सांगण्याचा खुप प्रयत्न केला. गुन्हा नोंदवून अटक केल्यानंतर जेव्हा त्यांना न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायाधिशांसमोर त्यांनी मारहाणीबाबत काहीच सांगितलेले नाही. मात्र जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी माध्यमांमध्ये खोटी माहिती देत यंत्रणेवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला असे पाटील यांनी सांगितले.