शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

‘पुढारी’च्या स्पष्टीकरणावर क्राइम ब्रँच असमाधानी

By admin | Published: November 02, 2015 3:08 AM

मटकाप्रकरणी दिलेल्या स्पष्टीकरणावर समाधान न झाल्याने ‘दैनिक पुढारी’च्या गोव्यातील निवासी संपादकांना रितसर समन्स बजावण्याचा निर्णय क्राइम ब्रँचने घेतला आहे

पणजी : मटकाप्रकरणी दिलेल्या स्पष्टीकरणावर समाधान न झाल्याने ‘दैनिक पुढारी’च्या गोव्यातील निवासी संपादकांना रितसर समन्स बजावण्याचा निर्णय क्राइम ब्रँचने घेतला आहे. ‘दैनिक पुढारी’ व ‘दैनिक तरुण भारत’ या वृत्तपत्रांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. सीआरपीसी कलम ९१ अंतर्गत या दोन्ही दैनिकांना पत्रे पाठवून क्राइम ब्रँचने मटका प्रकरणात माहिती देण्यास सांगितले होते. तथापि, तांत्रिक कारण पुढे करून ‘दैनिक पुढारी’ने एकदा माहिती देण्याचे टाळले, परंतु पोलिसांच्या दुसऱ्या पत्राला त्यांना उत्तर द्यावेच लागले.काही दिवसांपूर्वी या दैनिकाच्या निवासी संपादकांकडून क्राइम ब्रँचला पत्र लिहून स्पष्टीकरण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या पत्रात दिलेली माहिती आणि पोलिसांनी मागितलेली माहिती यात काहीच संबंध नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सीआरपीसी कलम ४१ अंतर्गत दैनिक पुढारीच्या निवासी संपादकांच्या नावे समन्स बजावण्यात येणार असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली. माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी दाखल केलेली जनहीत याचिका गृहीत धरून मटका जुगारावर कारवाई न करणारे आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्याला मदत करणाऱ्या सर्वांविरुद्धच गुन्हा दाखल करण्याचा आदेश खंडपीठाने दिला होता. आयपीसी कलम १०९, १२० (बी), (३४), गोवा दमण दीव जुगार विरोधी कायदा कलम ३, ४, ११ (२) १२ (१) (अ) अंतर्गत १२ आॅक्टोबरला हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.