शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला अपहरणाचा कट

By admin | Published: October 03, 2016 2:59 AM

लहान मुलाचे अपहरण करण्यासाठी चालकावर चाकूने हल्ला करून टॅक्सी चोरणाऱ्या तिघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे

नवी मुंबई : एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या लहान मुलाचे अपहरण करण्यासाठी चालकावर चाकूने हल्ला करून टॅक्सी चोरणाऱ्या तिघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्यांना ‘क्राइम पेट्रोल’ मालिकेतून ही शक्कल सुचली होती. त्यानुसार चोरीच्या टॅक्सीतून नेरूळमधीलच एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या लहान मुलाचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा त्यांनी कट रचला होता. परंतु अपहरणाच्या प्रयत्नात असतानाच नेरूळ पोलिसांनी शिताफीने त्यांना अटक केली.पामबीच मार्गावर मंजुर खान या टॅक्सी चालकावर चाकूने हल्ला करून लुटल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी घडली होती. मानखुर्द येथून प्रवासी भाडे घेवून आल्यानंतर परत मुंबईच्या दिशेने जाताना एलपी पुलापासून दोघे जण त्यांच्या टॅक्सीत बसले होते. त्यांनी एक साथीदार सानपाडा येथे असल्याचे सांगून त्याठिकाणी इतर एकाला टॅक्सीत घेतले. त्यानंतर एक वस्तू नेरुळमध्येच विसरल्याचे सांगून पामबीच मार्गे टॅक्सी नेरुळच्या दिशेने घेवून आले. परंतु पामबीच मार्गावर तलावालगत टॅक्सी थांबवून खान यांच्यावर चाकूने हल्ला करून झाडीमध्ये फेकून त्यांची टॅक्सी (एमएच ०१ एटी ४५५८) चोरली होती. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाकरिता उपआयुक्त प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस निरीक्षक भागुजी औटी, सहाय्यक निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड, राजेश गज्जल यांच्या पथकाने तपास सुरू केलेला.यादरम्यान पोलिसांना संशयितांची व चोरीच्या टॅक्सीची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून तिघांनाही नेरुळमधून अटक करण्यात आली. त्यांच्यापैकी एक अल्पवयीन (१७ वर्षांचा) असून ललित रामचंद्र ठाकूर (२१), सूरज शंकर पाटील (२२) अशी इतर दोघांची नावे आहेत. तिघेही नेरुळचे राहणारे असून गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. शिवाय ते नेहमी ‘क्राइम पेट्रोल’ ही गुन्हेविषयक मालिका पहायचे. यातूनच अपहरणाची कल्पना सुचल्याची कबुली त्यांनी दिल्याचे उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी काही ट्रक चालकांना लुटले असून एकदाच मोठी रक्कम कमवण्याच्या उद्देशाने त्यांनी अपहरणाचा कट रचला होता. याकरिता काही दिवस नेरुळच्या वंडर्स पार्कमध्ये सकाळच्या वेळी पाळत ठेवल्यानंतर एक प्रतिष्ठित व्यक्ती व एका प्रतिष्ठित व्यक्तीचा लहान मुलगा अशा दोघांच्या अपहरणाचा कट रचला होता. त्याकरिता चोरलेली टॅक्सी घेवून ते वंडर्स पार्कलगत पाळत ठेवून होते. परंतु ठरवलेल्या दोघांच्या अपहरणाची संधी त्यांना मिळत नव्हती. याचदरम्यान नेरुळ पोलिसांना त्यांची माहिती मिळताच सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. तर वेळीच त्यांच्या अटकेमुळे संभाव्य दोघांचे अपहरण टळल्याचे उपआयुक्त खैरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)