शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी गुन्हा; गर्दी जमवल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 12:16 AM

यात्रेच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी गर्दी जमली होती. तसेच यात्रेमध्येदेखील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती

नाशिक : एकीकडे कोरोनाच्या तीसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना दुसरीकडे मात्र भाजपचे नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शहरात शनिवारी (दि.२८) काढलेल्या जनआशिर्वाद यात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शहर पोलिसांनी या यात्रेसाठी परवानगी नाकारल्याचे समोर आले असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना यात्रेनिमित्त गर्दी जमविल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पाथर्डीफाटा येथून पवार यांच्या यात्रेला वाजत गाजत पोलीस बंदोबस्तात शनिवारी दुपारी प्रारंभ करण्यात आला. यात्रा अंबड पोलीस ठाणे हद्दीतून सुरु हाेऊन पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशीरा समाप्त झाली. दरम्यान, दुचाकीस्वारांनी या रॅलीत सहभागी होत पाथर्डीफाटा ते उंटवाडीदरम्यान ‘रोड-शो’ करत कोरोनाचे सर्व प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर बसवून विनाकारण गर्दी जमविल्याचा ठपका अंबड पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे. जनआशिर्वाद यात्रेच्या आयोजकांवर भादंवि कलम-१८८नुसार अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दरम्यान, यात्रेच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी गर्दी जमली होती. तसेच यात्रेमध्येदेखील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दीउसळली होती. यावेळी कोवीड प्रतिबंधात्मक नियम सर्रासपणे पायदळी तुडविले गेल्याने पोलिसांकडून रात्री याप्रकरणी जनआशिर्वाद यात्रा आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया अन्य काही पोलीस ठाण्यांमध्येही रात्री उशिरापर्यंत सुरु होती. दरम्यान, या यात्रेला पोलिसांकडून परवानगी पोलीस आयुक्तालयाकडून नाकारण्यात आली होती. पंचवटी पोलीस ठाण्यामध्येसुद्धा याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरु होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDr Bharti Pawarडॉ. भारती पवार