ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 7- शहादा येथील भाजी मार्केटच्या पाठीमागील भागात अनैतिक व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या दोघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा भाजी मार्केटच्या मागील बाजूस रेखा विक्रम तायडे रा.खडकी, जि.अकोला यांचे दोन घरे आहेत. ही घरे त्यांनी नेपाळ व राजस्थान येथील दोन तरुणींना अनैतिक व्यवसायासाठी भाड्याने दिली होती. त्यासाठी तिला नंदुरबार येथील अमर टॉकीज परिसरात राहणारा विकास नरेंद्र मराठे याने मदत केली. शहादा पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता पोलिसांना तेथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी रेखा विक्रम तायडे व विकास नरेंद्र मराठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी घरातून ३६ हजार १४० रुपये रोख, चार मोबाईल व इतर साहित्य असे एकुण ५२ हजार ४१० रुपयांचे साहित्य जप्त केले. सहायक पोलीस निरीक्षक कालीदास आनंदराव पोतदार यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्यांवर गुन्हा
By admin | Published: August 07, 2016 7:38 PM