शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

ओबीसी शुल्क प्रतिपूर्तीसाठी क्रिमिलेअरची मर्यादा ६ लाख

By admin | Published: April 05, 2016 2:32 AM

ज्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना शिक्षण फी आणि परीक्षा फीची प्रतिपूर्ती दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुंबई : ज्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना शिक्षण फी आणि परीक्षा फीची प्रतिपूर्ती दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सध्या ही मर्यादा ४ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. ती वाढविण्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्र्यांनी विधिमंडळात पूर्वीच केली होती. मात्र, अद्यापही तसा आदेश निघालेला नाही. हा आदेश तातडीने काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. अर्थसंकल्पातील सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग आणि कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देत होते. राज्यामध्ये ओबीसींसाठी असलेली समिती जो अहवाल देईल त्यावर राज्य सरकार नक्कीच गांभीर्याने विचार करेल; तसेच यासंदर्भात येत्या दोन महिन्यांत बैठक घेऊन ओबीसींचे प्रश्न सोडविले जातील. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. स्कॉलरशिपसाठी क्रिमिलेअरची मर्यादा ६ लाख आहे.बेरोजगारीच्या समस्येला आपल्या सरकारने हात घातला आहे. मेक इन इंडिया कार्यक्रमात सात लाख दोन हजार रोजगार देण्याबाबतचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यापैकी नॅसकॉम ५० हजार तरुणांना प्रशिक्षित करणार असून, टेक महिंद्रा २५ हजार तर टाटा ट्रस्टने एक लाख तरु णांना कौशल्य विकासाअंतर्गत प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री इंटर्नशिप योजनेप्रमाणे अन्य विभागांसाठीही अशी योजना तयार करण्याबाबत विचार करू, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)