शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

रस्ते खराब झाल्यास ठेकेदार, अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा

By admin | Published: May 04, 2017 11:40 PM

सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

समीर देशपांडे --कोल्हापूर  --यापुढील काळात डांबरी, सिमेंटचा रस्ता अथवा पूल मुदतीआधी खराब झाल्यास संबंधित कंत्राटदार आणि पर्यवेक्षण अधिकारी यांच्याविरोधात दिवाणी किं वा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. २७ एप्रिलला सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या या आदेशामुळे या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मात्र, कामाचा दर्जा टिक ण्यासाठी हा निर्णय पूरक ठरणार आहे यात शंका नाही. मार्च २0१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रस्ते, पूल, रेल्वे उड्डाणपूल या बांधकामांचा समावेश करण्याकरिता अनेक प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केले होते. यातील अनेक कामांना प्रशासकीय मान्यताही दिली आहे. मात्र, अनेक डांबरी रस्ते, सिमेंटचे रस्ते हे एक दोन वर्षांतच खराब झाल्याचे प्रकार शासनाच्या निदर्शनास आलेत. तसेच एक दोन वर्षांत बांधलेले पूल पडण्याच्याही घटना घडलेल्या आहेत. अशा डांबरी, सिमेंटच्या रस्त्यांवर तसेच पुलांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना एक दोन वर्षांतच हे रस्ते खराब होतात. त्यामध्ये सातत्याने खड्डे पडतात. पूलही पडतात. या सर्व बाबींचा विचार करून या नव्या कामांसाठी जे प्रशासकीय आदेश देण्यात येणार आहेत. त्यामध्ये एका नवीन अटीचा समावेश करण्याबाबतचा आदेश देण्यात आला आहे. यामध्ये रस्ता खराब झाल्यास किंवा पूल पडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदार आणि पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्यावर राहणार असून, त्यांच्यावर या प्रकरणी दिवाणी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ही अट आहे. नव्या कामांना प्रशासकीय मान्यता देताना या अटीचा समावेश करून संबंधित कंत्राटदाराची त्यासाठी मान्यता घ्यावी, असेही याबाबतच्या आदेशात नमूद केले आहे. सध्या नेहमीच्या पद्धतीने पाच ते सात वर्षे रस्ता टिकावा यासाठी किलोमीटरला ३0 लाख खर्च केला जातो; परंतु १५ वर्षे टिकण्यासाठीचा रस्ता करायचा झाला, तर किलोमीटरला एक कोटी रुपये खर्च येईल. कारण तो १५ वर्षे टिकायचा झाला, तर त्याच पद्धतीने त्याची बांधणी करावी लागेल.नेमकी अट काय आहे?आयआरसी ३७/५८ मधील तरतुदीप्रमाणे जे डांबरी रस्ते बांधायचे आहेत, त्यांचे आयुष्यमान १५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर काँक्रि टच्या रस्त्यांसाठी ३0 वर्षे आयुर्मान धरण्यात आले आहे. तर आयआरसी कोडप्रमाणे नवीन पुलाचे बांधकाम हे १00 वर्षे टिकावे यासाठीचे संकल्पन करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे काम न केल्यास व या रस्त्यांमध्ये खड्डे पडल्यास किंवा काम खराब झाल्यास किंवा पूल पडल्यास कंत्राटदाराबरोबर आता पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यालाही जबाबदार धरले जाणार आहे. नुसते जबाबदार न धरता त्यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाईही करण्यात येणार आहे.