शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

गुन्हेगारांचे ‘चरित्र’ आता एका क्लिकवर उपलब्ध

By admin | Published: January 03, 2017 5:42 AM

जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात छोट्यात छोटा गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगाराचे ‘चरित्र’ ठाणे पोलिसांनी विकसीत केलेल्या सॉफ्टवेअरमुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये उलगडणार

जितेंद्र कालेकर, ठाणेजिल्ह्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात छोट्यात छोटा गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगाराचे ‘चरित्र’ ठाणे पोलिसांनी विकसीत केलेल्या सॉफ्टवेअरमुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये उलगडणार असल्याने गुन्हेगारीला चाप लावण्यास मोठा हातभार लागणार आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरचा उपयोग होत असून ठाण्यातील यशस्वीतेनंतर संपूर्ण राज्यभरातील पोलिसांना त्याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी एका खासगी कंपनीच्या मदतीने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. ठाणे आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील ३३ पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या १५ ते २० वर्षांमध्ये दाखल झालेले गुन्हे, त्यामधील गुन्हेगारांच्या नाव, पत्यासह एका क्षणात उपलब्घ होणार आहे. त्यामुळे एखाद्याविरुद्ध कोणत्याही पोलीस ठाण्यात साधी छेडछाडीची तक्रार एखाद्या तरुणीने केली तर ज्याच्याविरुद्ध तक्रार आली, त्याचे केवळ नाव संगणकावर टाकताच त्याचे गुन्हेगारी ‘चरित्र’लागलीच समोर येईल. त्यामुळे ज्याच्याविरुद्ध छेडछाडीची तक्रार आली आहे, त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत किंवा कसे ते लागलीच कळेल व परिणामकारक कारवाई करणे सोपे होणार आहे. हाणामारी, चोरी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस संबंधित आरोपीवर चॅप्टर केस करतात. त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेतले जाते. मग, असे हमीपत्र दिले असतांनाहर पुन्हा हाणामारीच्या किंवा खुनाच्या प्रयत्नात तोच आरोपी आढळल्यास त्याचे आधीचे हमीपत्र रद्द करण्याची प्रक्रिया करुन पुन्हा नव्याने हमीपत्र देईपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीत टाकण्याची तजवीज होणार आहे.