पुणे : शहरातील राजकारणात मला अंधारात ठेवून काम केले जात नाही, तसे कोणी करूही शकत नाही. आम्ही गुन्हेगारीच्या विरोधात रान उठवण्याचे काम केले आहे. आघाडी सरकार उधळून लावले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव आहे़ महापालिका निवडणुकीत कोणत्याही गुन्हेगाराला तिकीट दिले जाणार नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. गुंड कमलाकर उर्फ बाबा बोडके व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीचे छायाचित्र शुक्रवारी सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बापट पत्रकारांशी बोलत होते. अनेक व्यक्ती मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. त्यांना भेटले म्हणजे तिकीट दिले जाईल, असे होत नाही. तसेच काही व्यक्ती मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव साधत आहेत, असेही बापट म्हणाले. दरम्यान, सामाजिक उपक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ठरली होती़ बाबा बोडके हे आमचे नातेवाईक असून, ते आमच्यासोबत आले होते़ त्याबाबत मुख्यमंत्री अनभिज्ञ होते, असे स्पष्टीकरण हावरे लीग आणि ग्रॅव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चरचे भागीदार मिहीर कुलकर्णी यांनी दिले़ या वेळी उज्ज्वला हावरे उपस्थित होत्या़ ६ नोव्हेंबरच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार असून या कार्यक्रमाला बाबा बोडकेही पे्रक्षकांमध्ये उपस्थित असतील, असेही त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)महापौरांनी मेट्रोबाबत राजकारण आणू नयेमहापौरांनी मेट्रो प्रकरणात राजकारण आणू नये. प्रकल्पाला उशीर झाल्याने नुकसान झाल्याचे ते सांगत आहेत. मात्र, दहा वर्षे उशीर झाला आहे, त्याचे पैसे मी मागू का? - गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे
महापालिका निवडणुकीत गुन्हेगारांना तिकीट नाही
By admin | Published: October 16, 2016 12:25 AM