नीलेश शहाकार, ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ९ - वन परिक्षेत्रातील गावालगत वावर असणा-या मोकाट व रानटी कुत्र्यांमुळे वन्य प्राण्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. रानटी कुत्र्यांमध्ये पसरत असलेल्या ‘कैनाईन डिस्टेंपर’ या व्हायरल आजाराची लागण थेट वन्यप्राण्यांना होत असून यामुळे वनक्षेत्रात नविन संकट निर्माण होण्याची शक्यत निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून बहुतांश अभयारण्यांमध्ये भटक्या वा रानटी कुत्र्यांची समस्या वाढते आहे. बुलडाणा शहराला लागून असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातही ही दिवसापूर्वी पहिल्यांदाच रानटी कुत्रे आढळून आले आहे. वनक्षेत्रात या कुत्र्यांचा नेहमीच उपद्रव आढळून येतो. त्यामुळे आता बुलडाणा लगतच्या ज्ञानगंगा अभयारन्यातील इतर वन्यजिवांना धोका निर्माणा होण्याची शक्यता आहे.
वनक्षेत्रात ही मोकाट कुत्री सांबर, हरीण, ससा व इतर लहान वन्यजिवांची शिकार करुन मांसाहार करतात. बºयाच वेळा त्यांची वाघ आणि बिबट्या बरोबरही झडप होते. यामुळे मनुष्यांनाही मोठा धोका असतो. जंगलामध्ये स्वैराचार करणाºया या मोकाट कुत्र्यांमध्ये कैनाईन डिस्टेंपर वायरल आजार आढळून येतो.
या वायरल आजाराने प्रभावित कुत्रे जर जंगलात वन्यप्राण्याच्या संपर्कात आले तर वन्यप्राणी बाधीत होवून सात दिवसात त्यांचा मृत्यू होतो. कुत्र्याच्या प्रजातीचे लांडगा व कोल्हा आणि मांजर प्रजातीचे वाघ आणि बिबट यांना या वायरसचा मोठा धोका असल्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.
काय आहे ‘कैनाईन डिस्टेंपर’
मोकाट व रानटी कुत्र्यामध्ये कैनाइन डिस्टेंपर हा जिवघेणा आजार आहे. या वायरसपासून प्रभावित कुत्र्यांना ताप, डोळे व नाकातून पाणी वाहने, उल्टी होणे, पाय व नाकाचा भाग कडक होतो, चार दिवसानंतर संपूर्ण शरीराला लकवा येतो आणि सात दिवसानंतर मृत्य होतो. हा वायरस कुत्र्यापासून जंगलातील कोल्हे व लांडग्यामध्ये पसरत असून इतर प्राण्यासाठीही धोकादायक ठरत आहे. दिल्ली येथील वाइल्ड लाइफ लैब मध्ये केलेल्या रिसर्चमध्ये या वायरसचा शोध लागला आहे.
वनपरिक्षेत्रात अलर्ट
कैनाइन डिस्टेंपरपासून वनक्षेत्र व अभयारण्य सुरक्षीत करण्यासाठी अलर्ट करण्यात आला आहे. जंगलात आढळणाºया मोकटा कुत्र्यांना पकडणे, मोकाट कुत्र्यांना या वायरसची लागन आहे का, हे तपासण्यासाठी कुत्र्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करुन प्रयोगशाळेत तपासणी करणे, वनक्षेत्रात असलेल्या लोकवस्त्यामध्ये जागृती करणे आदी उपक्रम वनविभागाकडून राबविले जात आहे. अशी माहिती बुलडाणा जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली.