शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

विधानसभेत रणकंदन; कामकाज गुंडाळले, परिचारकांची बडतर्फी अन् मुंडेंच्या निलंबनाच्या मागणीवरून अभूतपूर्व गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 5:08 AM

आॅडिओ क्लिपवरून वादाच्या भोव-यात अडकलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निलंबनासाठी तसेच सैनिकांचा अपमान करणारे भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्या बडतर्फीच्या मागणीवरून आज विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला.

- विशेष प्रतिनिधीमुंबई - आॅडिओ क्लिपवरून वादाच्या भोवºयात अडकलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निलंबनासाठी तसेच सैनिकांचा अपमान करणारे भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्या बडतर्फीच्या मागणीवरून आज विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला.सत्ताधारी व विरोधकांनी आमनेसामने येऊन दिलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. शेवटी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. परिचारकांच्या बडतर्फीच्या मागणीवरून भाजपा विरुद्ध इतर पक्ष एकवटल्याचे चित्र होते.कामकाज सुरू होताच शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी परिचारकांच्या बडतर्फीची मागणी केली. परिचारक यांनी सैनिकांचा केलेला अपमान हा देशद्रोहापेक्षाही भयंकर असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे सदस्य या बडतर्फीच्या मागणीसाठी वेलमध्ये उतरून घोषणा देऊ लागले. त्याचवेळी भाजपाचे सदस्य आक्रमक होत पुढे आले आणि धनंजय मुंडेंच्या निलंबनाच्या मागणीवरून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळात अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा शिवसेनेच्या सदस्यांनी परिचारकांच्या निषेधाचे कापडी फलक फडकविले. त्यातच भाजपाच्या सदस्यांनी मोकळ्या जागेकडे धाव घेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना निलंबित करण्याची घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी परिचारक यांना बडतर्फ करण्याची विरोधी पक्षांचीही मागणी असल्याचे सांगितले.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या गोंधळातच स्पष्ट केले की, यासाठी विधान परिषदेने सर्वपक्षीय समिती नेमली होती. त्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही सदस्य होते. त्यामुळे आता या पक्षांना निलंबन मागे घेण्यास विरोध करण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे आता त्यावर राजकारण करता येणार नसून या ठरावावर किमान एक वर्षे कोणतीही दुरुस्ती करता येणे शक्य नसल्याचे त्यांनी गोंधळातच सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तरीही शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ तसाच सुरू ठेवल्याने अखेर अध्यक्ष बागडे यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी पुन्हा तहकूब केले. या वेळी भाजपाचे सदस्य धनंजय मुंडे यांच्या निलंबनाच्या मागणीवरून आक्रमक झाले व त्यांनीही वेलमध्ये धाव घेतली. त्या गदारोळात कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. ते पुन्हा सुरू झाले, पण तरीही गोंधळ कायम राहिल्याने अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.आॅडिओ क्लिपच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमा - मुख्यमंत्रीवृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आलेल्या वादग्रस्त सीडीवरून चर्चा सुरू आहे. हा विषय गंभीर आहे. कोणाची बाजू खरी हे तपासणे आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजाबाबत जनतेचा चुकीचा दृष्टिकोन निर्माण होऊ नये ही जबाबदारी आपली आहे. विधिमंडळाची शान राखली गेली पाहिजे.सीडीची फॉरेन्सिक व व्हॉइस टेस्टिंग होईलच, पण या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, विधान परिषदेचे सभापती, विधान परिषदेचे सभागृह नेते यांची उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांना केली.राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावास पाठिंबा दर्शविला आणि पुढील कामकाज सुरू करण्याची विनंती केली. मात्र तरीही भाजपा, शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्याने अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनMaharashtraमहाराष्ट्र