डोंबिवली- यूपीवाले आणि राज ठाकरे यांचा डीएनए एकच आहे, अशी टीका भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. राज ठाकरे म्हणतात की, यूपीवाला आला आणि त्यांनी मुंबईतील मराठी टॅक्सीवाल्याचा धंदा खाऊन टाकला. एक दिवशी मला ठाकरे यांचा केस सापडला. तो हैद्राबाद येथील डीएनए तपासासाठी पाठिवाला असता यूपीवाल्या टॅक्सीचालकाचा व राज ठाकरे यांचा डीएनए एकच मिळून आला. राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचा असेल तर ते यूपीतून महाराष्ट्रात आले असल्याचं खळबळजनक वक्तव्य भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं.
विराट हिंदूस्थान संगम आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विचार वेध या व्याख्यानाचे आयोजन डोंबिवली ब्राह्मण सभागृहात करण्यात आलं. हिंदुस्थान हा शब्द हिमालय आणि हिंदू सागर या दोन शब्दांच्या संधी मिलनातून तयार झालेला आहे. आर्य खैरबखिंडीतून आले. त्यांनी द्रविडाना हरविले हा खूळचट शोध इंग्रजांनी आपल्यावर लादला. गैर हिंदू लोक हे वास्तविक पाहता हे हिंदूच होते. डीएनएचा आधार घेतल्यास सगळ्या भारतीयांचा डिएनए एकच दिसून येतो. याविषयी बोलताना ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका करुन उपरोक्त वक्तव्याने खळबळ उडवली आहे..
मनसे कार्यकत्र्यानी विचारला स्वामी यांना जाबसुब्रमण्यम स्वामी यांनी राज ठाकरे व यूपीच्या लोकांचा डीएनए एकच असल्याचे वक्तव्य केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी धाव घेतली. यावेळी स्वामी कार्यक्रम आटोपून परतण्याच्या तयारीत होते. त्यावेळी कदम यांनी स्वामी यांनी तुम्ही मराठी माणसासाठी काय केले आहे. राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जे काम केले आहे. ते तुम्ही केले आहे का. तुम्हाला त्यांचा डीएनए काढण्याचा अधिकार काय असा सवाल उपस्थित करुन फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तुम्ही काही एक भाष्य केले नाही. यावेळी स्वामी यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस होते. त्यांनी कदम यांना जास्त काही बोलू दिले नाही. स्वामी यांनी केवळ ठाकरे यांचा डीएनए काढला नसून राज ठाकरे यांनी मला सांगावे त्यांना ही गोष्ट सिद्ध करुन दाखविण्यास केव्हापण तयार आहे. त्यांचे आव्हान मी स्विकारू शकतो हे कार्यक्रमापश्चातही मीडीयाशी बोलताना स्वामी यांनी सांगितले. त्या पाठोपाठ मनसे त्यांना जाब विचारण्यासाठी पोहचले.