शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

माजी प्रियकराला अद्दल घडवण्यासाठी रचलेल्या कटात फसली ती

By admin | Published: June 04, 2017 6:13 PM

आपल्याला प्रेमात मिळालेल्या धोक्याचा बदला घेण्यासाठी एका 24 वर्षीय मुलीने शक्कल लढवत कट रचला पण त्या कटात ती स्वतच फसली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 4 - आपल्याला प्रेमात मिळालेल्या धोक्याचा बदला घेण्यासाठी एका 24 वर्षीय मुलीने शक्कल लढवत कट रचला पण त्या कटात ती स्वतच फसली आहे. हे प्रकरण घडले आहे मायानगरी मुंबईत. शुक्रवारी दादर रेल्वे स्टेशनवर शिवानी भिंगार्डे ह्या 24 वर्षीय मुलीने गस्तीवर असणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कॉन्स्टेबल्सना - अशोक कुमार आणि धीरज कुमार यांना एक निळ्या रंगाचं पाकिट दिलं. तिला ते ब्रिजवर सापडल्याचं तिनं सांगितलं. पोलिसांनी तिला स्टेशनमास्तरकडे जायला सांगितलं, पण तिनं तिला वेळ नसल्याचं सांगत पाकिट तिथंच बाकड्यावर ठेवून दिलं आणि पोलिसांना म्हणाली, तुम्हाला हवं तर तुम्ही ते उघडून पाहू शकता. कॉन्स्टेबल्सनी ते पाकिट उघडून पाहिलं तर आत एक 100 रुपयांची नोट आणि एक चिट्ठी होती. चिठ्ठीत लिहिलं होतं, भाई (छोटा शकील) ने जो पाकिस्तानसे आदमी इंडिया में भेज दिये हैं, उनसे मुंबई और पुणे में बडा धमाका करने का प्लान बनाने के लिये मुझफ्फर शाह पुणे से बॉम्बे आने वाला हैं. आगे क्या करना हैं, कैसे करना हैं, वो मुझफ्फर बतायेगा. भाई मुझफ्फर के कॉन्टॅक्ट मे हैं. तुम सब तैयार रहो धमाके के लिये. या निरोपासह मुझफ्फरचे तीन मोबाईल क्रमांकही लिहिले होते.त्या मुलीने दिलेल्या या चिठ्ठीमुळे ATS , GRP आणि RPF यांचा संपूर्ण दिवस एका रचलेल्या कटाची उकल करण्यात गेला. चिठ्ठी वाचतील मजकूर वाचताच कॉन्स्टेबलची दाणादाण उडाली. रेल्वे पोलीस फोर्स, गव्हर्नमेंट पोलीस फोर्स आणि दहशतवाद विरोधी पथक कामाला लागले. चिठ्ठीत लिहिलेला अतिरेक्यांचा म्होरक्या मुझफ्फर आणि ती पाकिट देणारी मुलगी या दोघांचा पोलीस शोध घेऊ लागले. दादर स्थानकावरचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांनी शिवानी आणि त्या आरपीएफ कॉन्स्टेबल्समधील २० सेकंदाचं संभाषण झालेलं पाहिलं, त्यानंतर ती दादरच्या पश्चिम दिशेने बाहेर पडली. रेल्वे अधिकाऱ्यांनी आधीचे सीसीटीव्ही फुटेज शोधले तेव्हा कळलं की ती दादर ते परेल दररोज प्रवास करते.दुसरीकडे एटीएस ने चिठ्ठीतले मोबाईल क्रमांक तपासल्यावर कळले की ते मोबाईल क्रमांक वापरणारी व्यक्ती मुंबई आणि पुणे ये-जा करते. शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलिसांना मोबाइल क्रमांकावरून मुझफ्फर पुण्यात असल्याचे कळले आणि त्यांनी त्याला कोथरूडमधून ताब्यात घेतले. गोंधळलेला मुझफ्फर हा सर्व प्रकार काय आहे माहित नाही, आपला बॉम्बच्या धमकीशी काही संबंध नाही असे वारंवार सांगत होता. जेव्हा पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवले तेव्हा त्याने शिवानीला पटकन ओळखले आणि तिच्याशी प्रेमसंबंध होते असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वे पोलीसांनी शुभांगीला दादार स्थानकावरुन अटक केली. त्यांनतर तिची चौकशी केली असता तिनंच ती चिठ्ठी लिहिल्याचं कबूल केलं. शिवानी आणि मुझफ्फर रत्नागिरीच्या कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्यात प्रेम झालं. पण अलिकडेच मुझफ्फरचं लग्न अन्य एका मुलीशी झालं. लग्न होऊनही तो शिवानीला संपर्क करण्याचा प्रयत्न करत त्रास देई. तिला त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नव्हते. दोन दिवसांपूर्वी त्याने तिला मारहाणही केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी शिवानीने हा कट रचला.

हे दोघेही सध्या पोलीसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर कोणतीही केस नसली तरी पोलीस त्यांच्या विचारपूस करत आहेत.