कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्या करीत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकारने कृषी विमा योजना आणली खरी; परंतु या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे, उदासीनता दिसून येत आहे़ महाराष्ट्रातील स्थिती (स्रोत : कृषी विभाग)२०१४-१५मध्ये नैसर्गिक आपत्तीचा राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना फटका बसला. जानेवारी ते एप्रिल २०१४ दरम्यान राज्यात ६०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.विदर्भातील १० जिल्ह्यांतील यवतमाळ, अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांपैकी औरंगाबाद, बीड, जालन्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली.राज्यात १२ जिल्ह्यांत हवामानावर आधारित पीक विमा योजना आहे.
पीक विमा : शेतकरी उदासीन की सरकार?
By admin | Published: May 04, 2015 1:27 AM