शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पीक विमा: शेवटच्या दिवशीही रांगा, ३० लाखांपेक्षा अधिक शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 5:00 AM

मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राज्यातील बँकांसमोर रांगा कायम होत्या. विदर्भ, मराठवाड्यात लाखो शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात ३0 लाखांपेक्षा अधिक शेतकरी योजनेपासून अजून वंचित असल्याचे ‘लोकमत’ला आढळले. नगर जिल्ह्यात सर्व्हरच बंद पडल्याने गोंधळ उडाला. नाशिकला योजनेस विशेष प्रतिसाद मिळालेला ...

मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राज्यातील बँकांसमोर रांगा कायम होत्या. विदर्भ, मराठवाड्यात लाखो शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात ३0 लाखांपेक्षा अधिक शेतकरी योजनेपासून अजून वंचित असल्याचे ‘लोकमत’ला आढळले. नगर जिल्ह्यात सर्व्हरच बंद पडल्याने गोंधळ उडाला. नाशिकला योजनेस विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. बºयाच जिल्ह्यांत संध्याकाळपर्यंत पीक विमा काढलेल्या शेतकºयांची अधिकृत आकडेवारी मिळू शकली नाही.मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शेतक-यांना प्रचंड कसरत करावी लागली. रात्र-रात्र रांगा लावूनही अनेकांच्या पदरी निराशा आली.जालना जिल्ह्यात चार लाख शेतक-यांनी पीक विमा भरला. मागील वर्षी साडेचार लाख शेतकºयांनी पीकविमा उतरविला होता. बीडमध्ये ५ लाख ५ हजार, नांदेडमध्ये चार लाख, लातूरला ३ लाख ८६ हजार, हिंगोलीत सव्वालाख, उस्मानाबाद जिल्ह्यात ५० हजार शेतकºयांनी पीक विमा उतरविला.विदर्भातही ससेहोलपट-नागपूर जिल्ह्यात ४४ हजार शेतकºयांना खरीप पीक कर्ज वाटप झाले असून त्यांना विम्याचे कवच मिळाले. बिगर कर्जदारांचाही विमा काढला जात आहे, त्यामुळे संख्या वाढणार आहे.अमरावती जिल्ह्यात ३ लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ८१ हजार शेतकºयांनीच विमा काढल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. २ लाख १९ हजार शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.यवतमाळ जिल्ह्यात विविध बँकांच्या शाखांमध्ये सोमवारी शेतकºयांनी गर्दी केली होती. जिल्हा बँकेमार्फत २० हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी विमा काढल्याची माहिती सरव्यवस्थापक अरविंद देशपांडे यांनी दिली. तर वर्ध्यातील १६ हजारतर गडचिरोलीत १७ हजार, भंडाºयात ५४ हजार शेतकºयांनी पीकविमा काढला.पावणेदोन लाख शेतक-यांचा पीक विमा-खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जवळपास पावणेदोन लाख शेतकºयांनी पीक विमा उतविल्याची माहिती आहे. नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी ५९ हजार कर्जदार शेतकºयांनी पीकविमा उतरविला होता. यंदा मात्र केवळ १५ हजार सभासदांपुरताच विमा मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत.पीक विम्यापासून वंचितलातूर ७,७४,०००नांदेड ३,६७,०००हिंगोली २,२५,०००परभणी २,००,०००बीड १,५०,०००अमरावती २,१९,०००वर्धा ७९,०००जालना ५0,०००नाशिक ४१,०००नगरला सर्व्हर डाऊन-अहमदनगरला सोमवारी सरकारचे संकेतस्थळ सकाळी दहानंतर बंद होते़ त्यामुळे शेवटच्या दिवशीही अर्ज दाखल करणारे शेतकरी योजनेपासून वंचित राहणार आहेत़ जिल्ह्यात अंदाजे २ लाख शेतकरी विविध बँकांचे कर्जदार आहेत़