शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

एक रुपयात पीक विमा योजना आता गुंडाळणार, भरपाईचे चार निकषही वगळण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:41 IST

Crop insurance: शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक रुपयात पीक विमा योजना आता येत्या खरिपापासून गुंडाळली जाणार आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला आहे.

धाराशिव - शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक रुपयात पीक विमा योजना आता येत्या खरिपापासून गुंडाळली जाणार आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या खरिपापासून अंमलबजावणी करण्याचे निर्देश २६ मार्च रोजीच्या पत्राद्वारे कृषी विभागाने आयुक्तांना दिले आहेत.प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना भरावा लागणारा त्यांचा वाटा राज्य शासनानेच भरण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, योजनेचे खरिपातील लाभार्थी दुपटीने तर रब्बीत ९ ते १० पट लाभार्थी वाढल्याने व गैरव्यवहारही वाढीस लागल्याचा दावा करीत पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांना त्यांचा वाटा भरून योजनेत सहभागी करून घ्यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. मागील आठ वर्षात कंपन्यांना ४३ हजार २०१ कोटी रुपये हप्त्यापोटी दिले आहेत. तुलनेने कंपन्यांनी ३२ हजार ६५८ कोटी रुपयेच भरपाई दिली. त्यांना १० हजार ५४३ कोटी रुपये नफा झाला आहे.

का गुंडाळणार योजना ?विमा कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांच्या प्रचंड तक्रारी होत्या.हप्त्याच्या तुलनेत मिळालेली भरपाई पाहता कंपन्यांचा फायदा झाला.एक रुपयात विमा संरक्षण दिल्याने शासकीय, देवस्थानच्या जमिनीवरही विमा भरून गैरव्यवहार.ऊस, भाजीपाल्यास संरक्षण नसल्याने या पिकांऐवजी सोयाबीन, कांदा पिके दर्शवून गैरव्यवहार. 

हे अॅड ऑन कव्हर वगळलेप्रधानमंत्री पीक विमा योजनेत • केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळते.महाराष्ट्राने स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्चात नुकसान, प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे या बाबींचा अंतर्भाव करुन अतिरिक्त संरक्षण मिळवून दिले होते. हे संरक्षण आता राहणार नाही.

मागील आठ वर्षांपासून राज्यात पीक विमा योजना राबविली जात आहे. या काळात कंपन्यांना ४३ हजार २०१ कोटी रुपये हप्त्यापोटी दिले आहे. तुलनेने कंपन्यांनी ३२ हजार ६५८ कोटी रुपयेच भरपाई दिली. त्यांना १० हजार ५४३ कोटी रुपये नफा झाला आहे.कोट...शासनाने एक रुपयात पिक विमा योजना बंद करू नये. काही त्रुटी, दोष असतील ते दूर करावेत. ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक दिलासा बंद होईल. पीक विमा नुकसान भरपाई निश्चित करण्याच्या पद्धतीतही बदल करावेत.-अनिल जगताप, पीक विमा अभ्यासक, धाराशिव.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी