सुशांत मोरे / मुंबईमुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या मालमत्तेत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ किरकोळ नसून दुप्पट ते चौपट झाल्याचे एच ईस्ट आणि एच वेस्ट वॉर्डमधील म्हणजेच वांद्रे ते सांताक्रुझमधील उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे निदर्शनास आले आहे. यामध्ये गेल्या काही वर्षांत निवडणूक लढवलेल्या छोट्या-मोठ्या उमेदवारांबरोबरच विद्यमान नगरसेवकांचाही समावेश आहे. एच ईस्ट वॉर्डमधील काँग्रेसचे तीन उमेदवार मालमत्तेत आघाडीवर आहेत. यात धर्मेश व्यास, तुलिप मिरांडा आणि आसिफ झकारिया यांचा नंबर लागतो. प्रभाग क्रमांक ८७मधीलकाँग्रेसकडून धर्मेश व्यास यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या व्यवसाय असल्याची नोंद प्रतिज्ञापत्रात आहे. २00७ साली व्यास यांनी निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांची मालमत्ता १0 लाख ८८ हजार ७९ रुपये होती. परंतु आता त्यांची मालमत्ता ७ कोटी २८ लाख ७४ हजार ३६३ रुपये एवढी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या वॉर्डमधील सर्वाधिक श्रीमंत प्रभाग क्रमांक ९0मधील तुलिप मिरांडा ठरल्या आहेत. २00२ साली निवडणूक लढवलेल्या आणि गृहिणी असलेल्या तुलिप मिरांडा यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण मालमत्ता ४२ कोटी ५९ लाख ६३ हजार ९१२ रुपये आहे. त्यांच्या यापूर्वीच्या मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्रात नाही. प्रभाग १0१ आसिफ झकारिया यांना उमेदवारी मिळाली असून, २00७ आणि २0१२ साली त्यांनी पालिका निवडणूक लढवली होती. २0१२मध्ये त्यांची मालमत्ता ही १२ कोटी ९0 लाख ७ हजार ८९६ रुपये होती. आता हीच मालमत्ता २५ कोटी ६२ लाख ७९ हजार ९४७ रुपये एवढी आहे. शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ९८मधून अरविंद शिसतकर यांची मालमत्ता ४ कोटी ८८ लाख ६४ हजार ७२२ आहे. २00७ साली पालिका निवडणूक लढवली होती तेव्हा ३५ लाख रुपये एवढी मालमत्ता होती. हेच प्रभाग क्रमांक ९९मधील संजय अगलदरे यांच्याबाबतीतही असून, त्यांनी २00२ साली आणि २00७ साली पालिका निवडणूक लढवली. २00७ साली फक्त ३४ हजार ५00 रुपये मालमत्ता नमूद असलेल्या अगलदरे यांची आताची मालमत्ता ही १ कोटी १८ लाख ९५ हजार ४६६ रुपये आहे. प्रभाग क्रमांक ९५मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी १९९७ साली पालिका निवडणूक आणि २00४ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली होती. २00४ साली ३ लाख ६0 हजार रुपये मालमत्ता होती आणि आता पालिका निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात १ कोटी २ लाख ५९ हजार २३0 रुपये मालमत्ता आहे. भाजपाच्या प्रभाग ९0मधील शैला थोरात या आघाडीवर असून, त्यांची आताची मालमत्ता ही ४ कोटी ४५ लाख २४ हजार ५00 रुपये आहे. त्यांनी २00७ आणि २0१२ साली पालिका निवडणूक लढवली होती. २0१२मध्ये त्यांची मालमत्ता १ कोटी ७१ लाख ८५ हजार ३२२ रुपये एवढी होती. असेही उमेदवारच्प्रभाग ९३मध्ये बहुजन समाज पार्टीकडून प्रज्ञा बनसोडे या उमेदवार आहेत. अवघे २९ वय आणि गृहिणी असलेल्या बनसोडे यांनी २0१२ साली पालिका निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांची मालमत्ता ७६५ रुपये होती. आता ९७ हजार १२२ रुपये मालमत्ता आहे. प्रभाग क्रमांक ९९मधून काँग्रेसकडून व्यंकटेश संबुटवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २0१२ साली निवडणूक लढवली तेव्हा ६७ लाख ४७ हजार ९९0 रुपये मालमत्ता होती आता हीच मालमत्ता २ कोटी ३८ लाख ९३ हजार १६१ एवढी आहे. १९९७, २00२, २00७, २0१२ची निवडणूक लढवलेले उमेदवार आणि विद्यमान नगरसेवक समाविष्टउमेदवारआधीची मालमत्ताआताची मालमत्ताकृष्णा पारकर (भाजपा-प्रभाग ८७)९८ लाख २२ हजार ५६९१ कोटी ६२,८0,११३महाडेश्वर पांडुरंग (शिवसेना-प्रभाग ८७)२0 लाख ८३ हजार ७३२ ७६ लाख ६८,१७२ धर्मेश व्यास (काँग्रेस-प्रभाग ८७)१0 लाख ८८ हजार ७९ रुपये७ कोटी २८,७४,३६३ हरकचंद लीलाधर (एनसीपी-प्रभाग ८८)१४ लाख८९ लाख २६,८२६ रुपयेसदानंद परब (शिवसेना-प्रभाग ८८)५ लाख रुपये ५२ लाख ९८ हजार सुभाष सावंत (अपक्ष-प्रभाग ८८)१ कोटी ७ लाख १0 हजार१ कोटी ७३,६८,२५६सुहास शिंदे (मनसे-प्रभाग ८८) २६ लाख ९९ हजार ५0१५८ लाख ३४,७५५ठाकूर सूर्यवंश बालरूप (काँग्रेस-प्रभाग ८९) ३ लाख ५0 हजार१ कोटी ७५ लाख ८४ हजारमिरांडा तुलिप (काँग्रेस-प्रभाग ९0) —-४२ कोटी ५९, ६३ हजार ९१२शैला थोरात (भाजपा-प्रभाग ९0) १ कोटी ७१ लाख ८५ हजार ३२२४ कोटी ४५,२४ हजार ५00दिनेश हळदणकर (भाकप-प्रभाग ९१)६0 लाख९७ लाख ३७ हजार ९८९शेख मोहम्मद रफीक (काँग्रेस-प्रभाग ९१)४१ लाख ८१ हजार ९३१ रुपये ११ कोटी ५८, ३८,८५८प्रज्ञा बनसोडे (बहुजन समाज पार्टी-प्रभाग ९३) ७६५ रुपये९७ हजार १२२प्रमोद गायकवाड (एनसीपी-प्रभाग ९५) ३ लाख ६0 हजार रुपये १ कोटी २, ५९ हजार २३0 प्रवीण नलावडे (काँग्रेस-प्रभाग ९५) ३५ लाख ७४ हजार ९७0 ६ कोटी २९, ९४ हजार कादरी मोहम्म शरीफ हयात (काँग्रेस-प्रभाग ९६) ४ लाख ३ कोटी ८0, ३७ हजारअर्जुन सिंह (काँग्रेस-प्रभाग ९७)५ लाख ३0 लाख २ हजार ३२0 अलका केरकर (भाजपा-प्रभाग ९८) ४ कोटी ९३ लाख ५ कोटी ३७, ५१ हजार ६६अरविंद शिसतकर (शिवसेना-प्रभाग ९८) ३५ लाख ४ कोटी ८८, ६४ हजार ७२२ संजय अगलदरे (शिवसेना-प्रभाग ९९) ३४ हजार ५00 रुपये१ कोटी १८, ९५ हजार ४६६ व्यंकटेश संबुटवाड (काँग्रेस-प्रभाग ९९) ६७ लाख ४७ हजार ९९0 रुपये २ कोटी ३८, ९३ हजार १६१ कॅरन डिमेलो (काँग्रेस-प्रभाग १00)१७ कोटी २ लाख ६६ हजार रुपये१८ कोटी ५५, २८ हजार ७६६ आसिफ झकारिया (काँग्रेस-प्रभाग १0१) १२ कोटी ९0 लाख ७ हजार ८९६ २५ कोटी ६२, ७९ हजार ९४७ कविता रॉड्रिक्स (काँग्रेस-प्रभाग १0२)३ लाख ७३ हजार ९00 रुपये२८ लाख ६२ हजार ५३८
कोटीच्या कोटी उड्डाणे
By admin | Published: February 13, 2017 3:46 AM