पिंपरी : आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम राहिला आहे. मावळ आणि परिसरात पावसाची संततधार राहिल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. वडिवळे धरण ९७ टक्के तर आंद्रा, पवना ही धरणे १०० टक्के भरली आहेत. कासारसाईचे धरण ९१ टक्के भरले आहे. धरणे भरल्याने भविष्यातील पाणीसमस्या दूर झाल्याने पिंपरी-चिंचवडकरांनी तसेच मावळातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.सांडव्यावरून वाहू लागले पाणीटाकवे बुद्रुक : आंदर मावळातील आंद्रा धरण १०० टक्के भरले असून, धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. धरण तळेगाव औद्योगिक वसाहतीस पाणीपुरवठा करण्यासाठी १५वर्षांपूर्वी बांधण्यात आले. शेतकऱ्यांसाठीही धरण वरदान ठरत आहे. इंद्रायणी नदीची उपनदी आंद्रावर धरण उभारण्यात आले आहे. धरणाची उंची ३४.५० मीटर असून, लांबी ३३० मीटर आहे. पाणलोट क्षेत्र ९०.३५चौरस किमी आहे. आळंदी व देहूच्या यात्राकाळातही धरणातून पाणी सोडले जाते. वडिवळे धरणातून विसर्गकरंजगाव : नाणे मावळ परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त असल्यामुळे येथील परिसरात धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. वडिवळे धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. वडिवळे धरणात गुरुवारी (दि. ११) ९६.३३ टक्के पाणीसाठा होता. धरणातून ४१२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात या वर्षी २१६२ मिमी पाऊस झाला आहे. धरणाची क्षमता ४०.८७ दलघमी आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी चांगला पाणीसाठा झाला आहे.कासारसाईत १२९ क्युसेकने विसर्गचांदखेड : धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे कासारसाई धरण १०० टक्के भरले आहे. परिसरात दमदार पाऊस पडत असल्यामुळे धरण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ८० टक्के भरले. त्याचप्रमाणे पुसाणे लघुपाटबंधारे प्रकल्पातून कासारसाई धरणात पाण्याचा विसर्ग धरणात येत असल्यामुळे धरणसाठा ११ आॅगस्ट अखेर ९१.६५ टक्के ठेवला असून, १२९ क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता १६.०४ दशलक्ष घनमीटर असून, सध्या पाणीसाठा १४.७२ दशलक्ष घनमीटर आहे.
मावळातील धरणे तुडुंब
By admin | Published: August 12, 2016 1:03 AM