कोल्हापूर : धूलिवंदन, गुड फ्रायडे, शिवजयंती आणि रविवार अशा चार दिवस सलग आलेल्या सुट्यांमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर आणि परिसर देशभरातून आलेल्या भक्तांनी शुक्रवारी फुलून गेला.गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. शनिवारी व रविवारीही मोठी गर्दी होण्याची चिन्हे आहेत. पर्यटकांचा ओघ पाहता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मंदिर परिसरात मोठे मंडप उभारण्यात आले आहेत. त्यामुळे भक्तांना परिसरात फिरताना उन्हाचे चटके बसत नाहीत. गेल्या चार दिवसांत रेल्वे, खासगी बसचे आरक्षणही फुल्ल झाले आहे.
अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी
By admin | Published: March 26, 2016 1:45 AM