यवतमाळ - स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा, स्वयंसहाय्यता समूहाच्या महामंडळ महिलांचा सत्कार, निधी वितरण व विशेष सहाय्य कार्यक्रम जिल्ह्यातील बचत गटांशी संवाद व मार्गदर्शन यासाठी पांढरकवडा तालुक्यातील रामदेवबाबा मैदानावर आयोजित मोदींच्या सभेसाठी अभूतपूर्व गर्दी दिसून येत आहे. महिलांचा सर्वात लक्षणीय सहभाग हे या गर्दीचे वैशिष्ट्य म्हणता येईल जवळपासच्या अनेक गावातून महिला सकाळपासूनच चालत येथे येताना दिसताहेत सभा स्थळापासून जवळपास दोन किलोमीटर परिसरातील रस्ते बंद करण्यात आल्यामुळे दुरून लोइ पायी येत आहेत.भारत माता की जय मोदिजी आगे बढो हम तुम्हारे साथ है पाकिस्तान का बदला लेके रहेंगे अशा प्रकारच्या घोषणा ऐकू येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौ-यावर आले असून, त्यांच्या हस्ते विदर्भ आणि खान्देशात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते एकलव्य मॉडेल स्कूलचे उद्घाटन होणार आहे. तसेच प्रधानमंत्री गृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात येतील. अजनी (नागपूर) ते पुणे रेल्वेचा ई-शुभारंभ, ग्रामोन्नती योजनेतील लाभार्र्थींना धनादेशाचे वाटप होणार आहे. त्यानंतर ते बचतगटांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित असतील.