विवेक भुसे /तन्मय ठोंबरे पुणे : पालखी, गणपती विसर्जन अशा उत्सवात नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात़. त्याचा गैरफायदा घेऊन गुन्हेगार मंगळसुत्र हिसकाविणे, पाकिटमारी, मोबाईल चोरी करणे असे गुन्हे करत असतात़. लाखांच्या गर्दीत गुन्हेगारांवर नजर ठेवणे मानवी डोळ्यांना केवळ अशक्य असते़. त्यामुळे पुणेपोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली असून त्या देशात सर्वप्रथम वापर सध्या पालखीमध्ये करण्यात आला आहे़. या पीटीझेड कॅमेरा टेक्नॉलॉजीचा वापर करुन गेल्या दोन दिवसात काही सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे़.गणेशविसर्जन मिरवणुकीच्या दिवशी काही तासात पुण्यातील विसर्जन मार्गावर दरवर्षी साधारण किमान एक हजार मोबाईल चोरीला जातात़. या सराईत चोरट्यांपैकी काही जणांपर्यंतच पोलीस पोहचू शकतात़. त्यामुळे सराईत गुन्हेगारांवर अशा गर्दीच्या वेळी नजर ठेवून त्यांनी गुन्हे करण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेण्याचे निश्चित केले़. त्यासाठी पीटीझेड कॅमेरा टेक्नॉलॉजीची मदत घेण्यात आली़.ज्या ठिकाणी मोठी गर्दी असेल, अशा ठिकाणी ही पोलीस व्हॅन नेल्यास कॅमेरा गर्दीवरुन फिरु लागतो़. त्या गर्दीत जर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असेल तर इतक्या गर्दीतही हा कॅमेरा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला टिपतो व त्याची सुचना व्हॅनमध्ये असलेल्या पोलिसांना स्किनवर दिली जाते़. व्हॅनमधील पोलीस या गुन्हेगाराचे लोकेशन व त्याचे वर्ण जवळच्या पोलिसांना तातडीने कळवितात़. गुन्हेगाराचे वर्णन, त्याचा फोटो व गर्दीत त्याचे लोकेशन मिळाल्याने पोलीस इतक्या गदीर्तूनही त्याला नेमके शोधून काढू शकतात़संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या बुधवारी पुण्यात आल्या़ .या पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़. पालख्यांबरोबर चालणारे काही लाख वारकरी, नागरिक यांच्या बरोबरच पोलिसांच्या अशा दोन व्हॅन फिरत होत्या आणि गर्दीत मिसळून असणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत होती़ त्यातून काही गुन्हेगार पोलिसांच्या हाताशी लागले आहेत़. गुरुवारी पालख्यांचा मुक्काम पुण्यात असतो़. त्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते़. त्या दोन्ही ठिकाणी या व्हॅन गर्दीतील गुन्हेगारांवर नजर ठेवून होत्या़. देशात अशा प्रकारे लाखोंच्या गर्दीवर व्हिजिलन्स करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचा सांगण्यात आले़.असे चालते या टेक्नॉलॉजीचे काम पोलिसांकडे रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची सर्व माहिती त्यांच्या छायाचित्रासह कॉम्प्युटरमध्ये साठविलेली असते़. एका पोलीस व्हॅनमध्ये इंजिनिअर, पोलीस कर्मचारी कॉम्प्युटरसह असतात़ या व्हॅनच्या वर हा पीटीझेड कॅमेरा बसविलेला असतो़. हा कॅमेरा व्हॅनमधील कॉम्प्युटरला जोडलेला असतो़. या कॉम्प्युटरमध्ये ज्या ज्या गुन्हेगारांची माहिती व छायाचित्र साठविण्यात आले आहेत़ त्याची माहिती कॅमेऱ्याला असते़ हा कॅमेरा ३६० अंशात फिरु शकतो़.
गर्दीत गुन्हेगार आता नाही लपू शकणार : देशात प्रथमच पालखीत वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 4:51 PM
गर्दीचा गैरफायदा घेऊन गुन्हेगार मंगळसुत्र हिसकाविणे, पाकिटमारी, मोबाईल चोरी करणे असे गुन्हे करत असतात़..
ठळक मुद्देपीटीझेड कॅमेरा टेक्नॉलॉजी पुणे पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची घेतली मदत पीटीझेड कॅमेरा टेक्नॉलॉजीचा वापर करुन गेल्या दोन दिवसात काही सराईत गुन्हेगार जेरबंद