ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. १२ - चंद्रपूरमध्ये समाजकंटकांनी काल रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचे पोस्टर व कट आऊट फाडल्याने तणाव निर्माण झाला. आज सकाळी हा प्रकार लक्षात येताच नागरिक रस्त्यावर उतरले. जमावाने रास्ता रोको सुरु केला आहे. दंगा नियंत्रण पथक व पोलीस कुमक पोहचली असून परिस्थिती शांत व नियंत्रणात आहे.