ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरसिंगला खोट्या आरोपात गुंतविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला. केंद्रीय क्रीडामंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात फडणवीस यांनी महाराष्ट्राचा मल्ल नरसिंग हा देशात सर्वाधिक यश्स्वी तसेच पुरस्कार विजेता मल्ल असल्याने डोप टेस्टमध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे कळताच धक्का बसला. आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार सराव करणाऱ्या या मल्लाविरुद्ध काही कट रचण्यात आला काय, याची सखोल चौकशी करावी. वैज्ञानिक पद्धतीनुसार चाचणीचा फेआढावा घेऊन हा कटाचा भाग होता काय, हे शोधून काढावे, अशी विनंती केली आहे.कोण आहे प्रवीण राणा!प्रवीण राणा हा ७४ किलो फ्री स्टाईल प्रकारातील मल्ल आहे. राणाने २०१४ मध्ये अमेरिकेच्या डेव्ह शूल्ट्झ मेमोरियल चॅम्पियनशिपमध्ये ७४ किलो गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. राणाचा रिओ प्रवेश नरसिंगला स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्यावर विसंबून असेल. त्यासाठी नरसिंगला शिस्तपालन समितीपुढे हजर व्हावे लागणार आहे............................................................नरसिंग दुसऱ्या चाचणीतही फेल५ जुलै रोज झालेल्या दुसऱ्या चाचणीतही (ब नमुना)नरसिंग फेल झाला आहे. त्याआधी २६ जून रोजी घेण्यात आलेल्या पहिल्या चाचणीत (अ नमुना) फेल होताच त्याच्यावर निलंबन बजावण्यात आले होते. प्रतिबंधित अॅनाबॉलिक स्टेरॉईड मेथाडिएनोन हे औषध नरसिंगच्या शरीरात आढळले होते...............................................................माझा मुलगा निर्दोष : भुलना देवीनरसिंग हा निर्दोष असल्याची भावना त्याची आई भुलना देवी हिने बुधवारी व्यक्त केली. कुणीतरी त्याच्याविरुद्ध कट रचला असल्याचे सांगून भुलना देवी पुढे म्हणाल्या,ह्य२६ वर्षांच्या नरसिंगला रिओमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला हवी.