मुंबई : नवरात्रौत्सव व दिवाळीनिमित्ताने सीएसटी ते करमाळीसाठी मध्य रेल्वेकडून १६ विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. ट्रेन नंबर 0१00१ सीएसटीहून १४ आॅक्टोबर ते २८ आॅक्टोबरपर्यंत प्रत्येक बुधवारी 00.२0 वाजता सुटेल. ट्रेन नंबर 0१00२ याच तारखांमध्ये करमाळी येथून प्रत्येक बुधवारी १४.२0 वाजता सुटेल आणि सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी १.२0 वाजता पोहोचेल. या दोन्ही ट्रेनच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. ट्रेन नंबर 0१00३ सीएसटी येथून ४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक बुधवारी 00.२0 वाजता सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी ११.३0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१00४ करमाळी येथून याच काळात प्रत्येक बुधवारी १४.२0 वाजता पोहोचेल आणि सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी १.२0 वाजता पोहोचेल.
सीएसटी-करमाळी विशेष फेऱ्या
By admin | Published: October 10, 2015 1:27 AM