ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मुंबईतील अत्यंत वर्दळीचं स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रात्री सुमारे साडे नऊ वाजता वीज पुरवठा खंडीत झाला. टाटा कंपनीकडून करण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात ट्रीपींग झाल्याने लाइट गेली होती. मात्र, मध्य रेल्वेकडे अशावेळी इमर्जेन्सी विद्युत सेवा असल्याने स्थानकाच्या काही भागात विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. टाटा कंपनीकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे. यामुळे स्थानकातील काही भागात अंधार तर काही भागात वीज असल्याचे चित्र आहे. या घटनेमुळे रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.