मुंबई : केंद्रीय शिक्षा मंडळाकडून घेण्यात आलेल्या सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट (सीटीईटी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालामध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. पहिली ते पाचवीसाठीच्या शिक्षकांचा एकूण निकाल १७.९० टक्के, तर सहावी ते आठवीच्या शिक्षकपदासाठी परीक्षा दिलेल्या शिक्षकांचा एकूण निकाल ९.१६ टक्के लागला आहे.यंदाचा सीटीईटीचा निकाल सुमारे सात टक्क्यांनी वाढला आहे. पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला २ लाख ७ हजार ५२२ शिक्षक बसले होते. यापैकी ३७ हजार १५३ शिक्षक उत्तीर्ण झाले असून, या परीक्षेचा निकाल १७.९० टक्के लागला आहे. गतवर्षी हा निकाल ११.९५ टक्के इतका होता. तसेच सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला ४ लाख ७० हजार ३२ शिक्षक बसले होते. त्यापैकी ४३ हजार ३४ जण यशस्वी ठरले असून, या परीक्षेचा एकूण निकाल ९.१६ टक्के लागला आहे. गतवर्षी या परीक्षेत केवळ २.८० टक्केच शिक्षक यशस्वी ठरले होते. (प्रतिनिधी)
सीटीईटीचा निकाल जाहीर
By admin | Published: April 04, 2015 4:44 AM