शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

लाखोंनी अनुभवला तुकोबांचा बीज सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2017 3:57 AM

संत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३६९व्या बीज सोहळ्यात गुरुवारी राज्यभरातील सुमारे तीन लाख भाविक सहभागी झाले होते

देहूगाव (जि. पुणे) : संत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३६९व्या बीज सोहळ्यात गुरुवारी राज्यभरातील सुमारे तीन लाख भाविक सहभागी झाले होते. श्री संत तुकाराममहाराज संस्थानाच्या वतीने पहाटे चारपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात पहाटे चारला काकडारती झाल्यानंतर मुख्य मंदिरातील पांडुरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरातील महापूजा श्री संत तुकाराममहाराज संस्थानाचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे, विश्वस्त अभिजित मोरे, सरपंच सुनीता टिळेकर यांच्या हस्ते झाली. पहाटे सहाला वैकुंठगमन मंदिरातील श्री संत तुकाराममहाराजांची महापूजा झाली. बीजोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी यात्रेपूर्वी दाखल झालेल्या दिंड्यांच्या फडावर रात्रभर जागर, पहाटे काकडारती, महापूजा, हरिपाठ वीणा-टाळ-मृदंग यांच्या साथीत भजन-कीर्तनासह हरिनामाच्या जयघोषासह विठ्ठल नामाचा मंत्र जपण्यात सारे वैष्णव दंग झाले होते. पहाटे महापूजा झाल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. सकाळपासूनच मानाच्या दिंड्या मारुती मंदिरापुढे अभंग-आरती घेऊन पालखीमार्गाने मंदिरात प्रवेश करीत होत्या. मंदिराला प्रदक्षिणा घालून हरिनामाचा गजर करीत उत्तर दरवाजाने देऊळवाड्याच्या बाहेर पडत होत्या. तुतारीवादक तांबे यांनी इशारा केला आणि पालखीचे भोई सेवेकऱ्यांसह अनेक भाविकांनी महाराजांच्या पालखीला सेवेचा खांदा दिला. पालखी पावणेबाराच्या सुमारास वैकुंठगमन मंदिराच्या आवारात असणाऱ्या नांदुरकीच्या झाडाखाली आली. येथे महाराजांच्या वंशातील बापूमहाराज मोरे देहूकर यांचे प्रथेप्रमाणे श्री संत तुकाराम महाराजांच्या महानिर्वाण प्रसंगावरील कीर्तन झाले. दुपारी बारा वाजता बोला पुंडलिका वरदा हारी विठ्ठल, असा हरिनामाचा व श्री संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर करीत भाविकांनी नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)