मुंबई : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यात सांस्कृतिक आदानप्रदान करण्यासाठी सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान केंद्रात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समक्ष या कराराचे हस्तांतरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या वतीने मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि ओडिशाच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव गगनकुमार धल यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. या कार्यक्र मात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय सांस्कृतिक-पर्यटन मंत्री महेश शर्मा आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)>कराराची वैशिष्ट्येदोन राज्यांमधील कलापथकांची देवाणघेवाण होणारमहाराष्ट्रातील पुरस्कार विजेत्या साहित्यकृतींचे उडियामध्ये भाषांतरसाहित्यविषयक कार्यक्रम आणि पाककला महोत्सवांचे आयोजनशालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सहलींचे आयोजनशेतीची पद्धत आणि हवामान याबाबत माहितीचे आदानप्रदानपारंपरिक वेषभूषांचे दोन्ही राज्यांमध्ये प्रदर्शन
महाराष्ट्र-ओडिशामध्ये सांस्कृतिक आदानप्रदान
By admin | Published: November 02, 2016 5:20 AM