तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील भीमा-वेळ नदय़ांच्या संगमावर विठ्ठलवाडी हे सांस्कृतिक वारसा लाभलेल्या 3क्क्क् लोकसंख्या असलेल्या गावात गेल्या अनेक वर्षापासुन दूरवरून लोक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत आहे.आषाढी एकादशीला लोकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते.
सुमारे 3क्क् वर्षापुर्वी साक्षात पंढरीच्या पांडुरंगाने श्रेष्ठसंत निळोबा रायांच्या स्वप्नात दृष्टांत दिला ‘विष्णुच्या डोहात मी आहे,माझी भेट घे,मग पिपळनेरहून निळोबाराय आले त्यांनी भीमा नदीच्या पाण्याबाहेर पांडुरंगाची मुर्ती काढली त्यावेळी तळेगाव ढमढेरे येथील सरदार बायजाबाई ढमढेरे या राणीकडे विठ्ठलवाडी गाव ऐतीहासीक काळापासुन इनामी होते त्यांनी मुर्तीची प्रतिष्ठापना सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने विठ्ठलवाडी येथे त्या काळात साध्या पद्धतीच्या पत्रच्या मंदीरात केली.पुढे ग्रामस्थांच्या पुढाकारातुन लोकवर्गणीतुन 198क् च्या दरम्यान या पांडुरंग मंदीराचा जिर्नोध्दार करून भव्य मंदीर उभारले.
या गावातील लोक गेल्या अनेक वर्षापासून परंपरेनुसार सांस्कृतीक वारसा जपत आषाढी एकादशी मोठ्य़ा उत्साहात साजरी केली जाते.तळेगाव ढमढेरे ,शिक्रापुर,राउतवाडी,कासारी निमगाव म्हाळुंगी,आदी ठिकाणांहून पालखी घेऊन ग्रामस्थ विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात.
दिवसभर भजनाचा कार्यक्रम होतो.रात्री किर्तन व त्यानंतर पं.हरिश्चंद्र गवारे यांचा भजन गायनाचा कार्यक्रम होतो दुस-या दिवशी गावच्या दिंडीने गाव प्रदक्षिणा घातली जाते
यावेळी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने हजेरी लावतात दुस-या दिवशी बारशीला ग्रामस्थांच्या
वतीने महाप्रसादाचा
कार्यक्रम सायंकाळी पारंपारीक पद्धतीने कृष्णलीलेवर
आधारीत (लळीत) सोंगांच्या कार्यक्रमाचे लोकांना खास आकर्षण असते.व गोपाल काल्याच्या दहीहंडीने सांगता होते.
तर तिस-या दिवशी पाऊलघडीच्या कार्यक्रमाने
तीन दिवसीय आषाढी एकादशीच्या उत्सवाची सांगता होते. (वार्ताहर)