शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

सांस्कृतिक माहेरघराला गालबोट

By admin | Published: March 04, 2017 12:41 AM

वेळ दुपारी ३ वाजताची. स्पर्धा परीक्षेविषयीचे व्याख्यान ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांची पावले बालगंधर्वकडे वळू लागली.

पुणे : वेळ दुपारी ३ वाजताची. स्पर्धा परीक्षेविषयीचे व्याख्यान ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांची पावले बालगंधर्वकडे वळू लागली. बघता-बघता सभागृहाच्या क्षमतेपेक्षाही अधिक विद्यार्थी रंगमंदिरामध्ये दाखल झाले. परिसरातही गर्दीने उच्चांक गाठला.. प्रत्येकालाच आत जायचे होते; मात्र सभागृह ‘हाऊसफुल्ल’ झाल्याने कर्मचाऱ्यांनी शटर अर्धवट ओढून घेतले आणि विद्यार्थ्यांची तिथेच ‘सटकली’. प्रवेश नाकारल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जमावाने दरवाजासह बालगंधर्व रंगमंदिराच्या नावाची तोडफोड केली. स्पर्धा परीक्षेमधून प्रशासकीय सेवेत पाऊल टाकणाऱ्या या विद्यार्थ्यांकडूनच शिक्षण आणि सांस्कृतिक माहेरघराला गालबोट लावण्याचा हा प्रकार शुक्रवारी घडला. बालगंधर्व रंगामंदिर येथे श्री बालाजी फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ सनदी अधिकारी भरत आंधळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या या संस्थेचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. हा कार्यक्रम विनामूल्य असल्याने या व्याख्यानासाठी ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रंगमंदिराची आसनक्षमता जवळपास एक हजाराची आहे. त्यात बाल्कनीची क्षमता ३२०, तर खाली ६६९ लोक बसू शकतील एवढी क्षमता आहे. मात्र, बाल्कनीत खूप गर्दी झाली होती. एका खुर्चीत दोन विद्यार्थी बसले होते. बाल्कनी कोसळण्याची भीती कर्मचाऱ्यांना वाटत होती. आत एवढी गर्दी झाल्यानंतर सुरक्षारक्षकाने विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरच अडविले. त्या वेळी पाठीमागून अचानक आलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यामुळे प्रवेशद्वाराचे गज वाकले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांची चेंगराचेंगरी झाली. त्यात काही तरुणीदेखील होत्या, त्याही जखमी झाल्या. अखेर व्यवस्थापकांना पोलिसांना पाचारण करावे लागले. व्यवस्थापकांना कार्यक्रम रद्द करावा लागला आणि विद्यार्थ्यांना सभागृहाबाहेर काढण्याची विनंती पोलिसांना करावी लागली. >येत्या १२ मार्च रोजी पीएसआयची स्पर्धा परीक्षा असून, आगामी हंगाम हा स्पर्धा परीक्षांचाच आहे. त्यामुळे कार्यक्रमाला एवढी गर्दी होईल, असे वाटले नव्हते. कार्यक्रम विनामूल्य ठेवण्यात आला होता. नुकसानभरपाई संदर्भात व्यवस्थापकांशी चर्चा करू. - मानसिंग साबळे, आयोजक>बालगंधर्वची आसनक्षमता एवढी नसतानाही विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेश नाकारल्यावर त्यांनी परिसरात तोडफोड केली. या संदर्भात आयोजकांकडून नुकसानभरपाई घेणार आहे.- भारत कुमावत, व्यवस्थापक बालगंधर्व