मुंबई : राज्यात आतापर्यंत २ लाख १३ हजार २३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात ६ हजार ४४ रुग्ण कोविडमुक्त झाले. मात्र अजूनही देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आठ टक्क्यांनी कमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण रविवारी ६४ टक्क्यांवर आले आहे, मात्र राज्यात हे प्रमाण ५६.७४ टक्के इतके आहे.राज्यात रविवारी ९ हजार ४३१ रुग्ण, तर २६७ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ३ लाख ७५ हजार ७९९ झाली आहे. तर बळींचा आकडा १३,६५६ वर पोहोचला आहे. सध्या १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मृत्यूदर ३.६३ टक्के आहे.दिवसभरातील २६७ मृत्यूंमध्ये मुंबई ५७, ठाणे १३, ठाणे मनपा १०, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा ९, उल्हासनगर मनपा ५, भिवंडी-निजामपूर मनपा २, मीरा-भार्इंदर मनपा १, वसई विरार मनपा ६, रायगड १२, पनवेल मनपा ७, नाशिक १, नाशिक मनपा ४, धुळे १, धुळे मनपा १, जळगाव १३, जळगाव मनपा २, नंदूरबार १, पुणे १७, पुणे मनपा २८, सोलापूर मनपा ८, सातारा १२, कोल्हापूर २, कोल्हापूर मनपा १, सांगली मिरज कुपवाड मनपा ३, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ८, जालना १, हिंगोली १, परभणी १, लातूर मनपा ३, उस्मानाबाद १, अकोला ४, अकोला मनपा १, अमरावती १, यवतमाळ ३, बुलढाणा ३, वाशिम १, नागपूर मनपा २, वर्धा १, अन्य राज्य/देशातील एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या राज्यात ९ लाख ८ हजार ४२० व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर ४४ हजार २६७ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.मुंबईत कोरोनाचे आणखी ५७ बळीमुंबईत रविवारी दिवसभरात १ हजार १०१ रुग्ण व ५७ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे शहर उपनगरात १ लाख ९ हजार १६१ कोरोना बाधित झाले आहेत. तर मृतांचा आकडा ६ हजार ९३ झाला आहे. मुंबईत ८० हजार २३८ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २२ हजार ५३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांत मुंबईच्या तुलनेत ठाणे, पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. ठाण्यात ३६ हजार १७४ तर पुण्यात ४८ हजार १८० सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १८ लाख ८६ हजार २९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.९२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आठ टक्क्यांनी कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 6:15 AM