महायुतीत फूट पडल्यामुळे मुंबई, ठाण्यात रंगलेल्या पंचरंगी विधानसभा निवडणुकांचा निकाल आज काय लागणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निकाल धक्कादायक असेल की एक्ङिाट पोलमधील अंदाज चुकवणारा लागेल, याबाबतच्या चर्चा आज संपतील. मुंबई आणि उपनगरांतील 36 मतदारसंघांसाठी 529 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सचिन अहीर, वर्षा गायकवाड, नसीम खान आणि सुरेश शेट्टी अशा चार माजी मंत्र्यांचा त्यात समावेश आहे. ठाणो आणि पालघर जिल्ह्यांतील 24 मतदारसंघांतील 296 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला 21 मतमोजणी केंद्रांवर होणार आह़े यामध्ये ठाण्याचे माजी पालकमंत्री गणोश नाईक यांच्यासह माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित आणि कोकण पाटबंधारे महामंडळाचे अध्यक्ष किसन कथोरे यांचा समावेश आह़े पंचरंगी लढतीमुळे मतविभाजन अटळ झाले असून शिवसेनेला ठाणो, भाजपाला डोंबिवली, राष्ट्रवादीला नवी मुंबई आणि बहुजन विकास आघाडीला वसई-नालासोपारा हे बालेकिल्ले टिकविण्याचे आव्हान आह़े