शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

ग्राहकांच्या बाउन्स चेकचा महावितरणला ‘शॉक’, दरमहा १० हजार धनादेश बाउन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 5:39 AM

वीजबिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी, लघूदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी महावितरणच्या वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे वीजबिलाचा

मुंबई  - वीजबिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी, लघूदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी महावितरणच्या वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे वीजबिलाचा आॅनलाइन भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.धनादेशाद्वारे वीजबिलाचा भरणा केल्यास, कोणत्याही कारणामुळे धनादेश बाउंस होण्याची शक्यता असते. सद्यस्थितीत महावितरणचे दरमहा सुमारे ७ लाख ग्राहक वीजबिलाचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. त्यापैकी साधारणत: १० हजार धनादेश दरमहा बाउंस होतात. त्यामुळे ग्राहकांना ३५० रुपये दंड, धनादेश अंतिम मुदतीच्या तारखेनंतर वटल्यास, पुढील बिलात लागून येणारी थकबाकी यासह सदर ग्राहकाची पुढील सहा महिने धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा स्थगित केली जाते, तसेच धनादेश बाउंसहोणे हा दखलपात्र फौजदारी गुन्हा आहे.रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे, धनादेश वटण्यास साधारणत: तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश वटल्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद ग्राहकांच्या खात्यावर होते. अनेक ग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवस अगोदर धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास, संबंधित ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश बाउन्स झाला, तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.काही ठिकाणी एखादी व्यक्ती १५ ते २० वीजग्राहकांच्या वीजबिलांची रक्कम रोख स्वरूपात घेऊन ती धनादेशाद्वारे भरते. यात धनादेश बाउन्स झाल्यास त्याचा वीजग्राहकांना नाहक आर्थिक फटका बसू शकतो व त्यांचा वीजपुरवठाही खंडित होऊ शकतो.त्रासापासून वाचण्यासाठी व घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी महावितरणची वेबसाइट व मोबाइल अ‍ॅपची सोय उपलब्ध आहे. इंटरनेट व मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून सद्यस्थितीत सुमारे ३५ लाख वीजग्राहक सुमारे ६०० कोटी रुपयांचा दरमहा वीजबिल भरणा करीत आहेत. त्यामुळे धनादेशाऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा.भांडुप परिमंडळाची मार्च २०१८ ची आकडेवारीठाणे विभागएकूण धनादेश - ८६,१४३रक्कम - ६२ कोटी ३० लाखबाउन्स धनादेश - १,४४१रक्कम - १ कोटी ३५ लाखवाशी विभागएकूण धनादेश - ६८,२३५रक्कम - ४८ कोटी ९३ लाखबाउन्स धनादेश - ८८५रक्कम - ७ लाख ६९ हजार

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र