मुंबई : अकरावी प्रवेशाची तिसरी यादी अखेर जाहीर झाली. तिसºया यादीत ५०,६३६ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले. विशेष म्हणजे तिसºया यादीत नामांकित महाविद्यालयांचा कट आॅफ अचानक वधारल्याचे दिसून आले. कला आणि वाणिज्य शाखेसाठी शहरातील काही नामंकित महाविद्यालयांचे कट आॅफ मागील कट आॅफपेक्षा १ ते ६ टक्क्यांदरम्यान वाढले आहेत. याप्रमाणेच काही महाविद्यालयांमधील जागा दुसºया यादीच्या प्रवेशातच फुल झाल्या आहेत. पसंतीक्रम बदलण्याच्या पर्यायाचा उपयोग करीत विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम बदलले असून पुन्हा आपला ओढा नामंकित महाविद्यालयांकडे वळविला आहे.
अकरावी प्रवेशाच्या तिसºया यादीसाठी आॅनलाइन प्रवेशाच्या १ लाख ८ हजार ५५४ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी अर्ज दाखल केलेल्या ७३,४१४ विद्यार्थ्यांपैकी ५०,६३६ विद्यार्थ्यांनाच तिसºया यादीत प्रवेश अलॉट झाले. यात तब्ब्ल १५,५४४ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय, ९,८१५ विद्यार्थ्यांना दुसºया तर ७,००७ विद्यार्थ्यांना तिसºया पसंतीचे महाविद्यालय अलॉट झाले. चौथ्या आणि पाचव्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झालेले विद्यार्थी अनुक्रमे ५,२९३ आणि ४,१५० आहेत. तिसºया कट आॅफ यादीत ज्या नामांकित महाविद्यालयांच्या कट आॅफमध्ये वाढ झाली आहे अशा महाविद्यालयांमध्ये के. सी, रूपारेल, मिठीबाई, वझे केळकर, बिर्ला, सीएचएम, केईएस कनिष्ठ महाविद्यालय अशांचा समावेश आहे. या महाविद्यालयांच्या कला शाखेच्या कट आॅफमध्ये वाढ झाली आहे. तर रूपारेल, वझे केळकर, सीएचएम महाविद्यालयांच्या वाणिज्य शाखेच्या कट आॅॅफमध्येही वाढ झाली आहे.
तिसºया यादीतील एकूण प्रवेशांपैकी ९२.३८ टक्के प्रवेश हे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना तर ६.६८ टक्के प्रवेश हे इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना अलॉट झाले. ५०,६३६ विद्यार्थ्यांना प्रवेश तिसºया यादीसाठी राज्य मंडळाच्या अर्ज केलेल्या ६७,९९५ विद्यार्थ्यांपैकी ४६,७७८ विद्यार्थ्यांना तर सीबीएसई मंडळाच्या १,४४१, आयसीएसईच्या १,४४९, आयबीच्या ५, आयजीसीएसईच्या २७३, एनआयओएस मंडळाच्या २१९ तर इतर मंडळाच्या ४७१ अशा प्रकारे एकूण ५०,६३६ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले.
कोटा प्रवेशाच्या जागांवर प्रवेशदुसºया गुणवत्ता यादीच्या समाप्तीपर्यंत इनहाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन या तीन कोट्याच्या एकूण ३४,६१७ जागांवर प्रवेश झाले असल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाने दिली. यात इनहाउस कोट्याचे ८,११४, अल्पसंख्याक कोट्याचे २३,८९२, व्यवस्थापन कोट्याचे २,६११ प्रवेश झाले आहेत. पहिल्या यादीत कोट्याचे ६१,६४५ प्रवेश झाले होते.२ ते ५ आॅगस्टदरम्यान प्रवेश निश्चिती आवश्यकदुसºया फेरीत ज्यांना प्रवेश अलॉट झाले त्यांनी २, ३ आणि ५ आॅगस्टदरम्यान (दुपारी ३ वाजेपर्यंत) संबंधित महाविद्यालयात मूळ कागदपत्रे घेऊन प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. विशेष गुणवत्ता यादीसाठी वाट पाहणाºया विद्यार्थ्यांना अर्जात पसंतीक्रम बदलायचा असल्यास ते ६ आणि ७ आॅगस्टदरम्यान बदल करू शकतील.दुसºया गुणवत्ता यादीपर्यंत झालेले कोटा प्रवेशकोटा एकूण जागा आतापर्यंतझालेले प्रवेशइनहाउस १७,९४७ ८,११४अल्पसंख्याक ८७,४५७ २३,८९२व्यवस्थापन १५,७५८ २,६११एकूण ३,२२,११६ १,२८,८४८मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचे शाखानिहाय कट आॅफमहाविद्यालय कला वाणिज्य विज्ञानएचआर महाविद्यालय - ९१.४ -केसी महाविद्यालय ८८. ६ ८८.४ ८४.४जय हिंद महाविद्यालय ८५.४ ८९.४ ८२.००रुईया महाविद्यालय ९२.०० - ८७.६आर. ए. पोदार महाविद्यालय - - -रूपारेल महाविद्यालय ८६.०० ८७.४० ८५.६साठ्ये महाविद्यालय ५३.०० ८४.४ ७०.४डहाणूकर महाविद्यालय - ८७.०० -भवन्स महाविद्यालय ६०.०० ८२.८ ७२.००मिठीबाई महाविद्यालय ८६.८ ८७.२ ८०.८एन. एम. महाविद्यालय - ९०.०० -वझे केळकर महाविद्यालय ८७.८ ९१.६ ८८.८मुलुंड महाविद्यालय - ८९.४ -सीएचएम महाविद्यालय ५४.४ ७६.८ ८६.६सेंट झेविअर्स ९४.०० - ८१.८बिर्ला महाविद्यालय ८१.०० ७९.८ ८०.४केईएस कनिष्ठ महाविद्यालय ७२.६ ७९.० -शाखा एकूण जागा अलॉटमेंटझालेले विद्यार्थीकला १४,२६० ३,६९०वाणिज्य ५५,९३२ ३४,०६५विज्ञान ३५,७८० १२,५४२एमसीव्हीसी २,५८२ ३३९एकूण विद्यार्थी १,०८,५५४ ५०,६३६बोर्डनिहाय अलॉटमेंटमिळालेले विद्यार्थीमंडळ एकूण अर्ज अलॉटमेंटमिळालेले विद्यार्थीएसएससी ६७,९९५ ४६,७७८सीबीएसई २,०२१ १,४४१आयसीएसई २,११८ १,४४९आयबी ०७ ०५आयजीसीएसई ४३४ २७३एनआयओएस ३०५ २१९इतर ५३४ ४७१एकूण ७३,४१४ ५०,६३६