शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

राम कदम यांची जीभ छाटा, आणि पाच लाख रुपये मिळवा, माजी मंत्र्याचे चिथावणीखोर वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 5:17 PM

भाजपा आमदार  राम कदम यांनी दहीहंडीवेळी मुलींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये.

बुलडाणा - भाजपा आमदार  राम कदम यांनी दहीहंडीवेळी मुलींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे या विधानाबाबत राम कदम यांनी माफी मागितली असली तरी त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राम कदम यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य करताना राम कदम यांची जीभ छाटा आणि पाच लाख रुपये बक्षीस मिळवा, असे विधान केले आहे. त्यामुळे एका नव्या वादास सुरुवात झाली आहे. राम कदम यांची जीभ छाटा आणि पाच लाख रुपये बक्षीस मिळवा, असे विधान सावजी यांनी केल्याचे वृत्त मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने प्रसारित केले आहे. भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात मुलींना पळवून आणू, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. राज्यातील अनेक ठिकाणी महिला संघटनांकडून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच त्यांच्या पोस्टरला चपलांचा मार देण्यात आला. तर विरोधकांनीही या प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आज आमदार राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माफीनामा जाहीर केला होता. 

टॅग्स :Ram Kadamराम कदमSubodh Savjiसुबोध सावजीMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण