शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

जनतेच्या बँकेतील पैशांवर सायबर गुन्हेगाराचा डोळा

By admin | Published: June 27, 2016 10:30 PM

अमुक बँकेतून बोलत आहे, तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपलेली असून त्याचे नूतनीकरण करण्यासाठी एटीएम कार्डवरील १६ अंकांची माहिती सांगा, मोबाईलवरील मेसेजची माहिती द्या

नागरिकांनो, सावधान : आॅनलाईन गंडा

औरंगाबाद : अमुक बँकेतून बोलत आहे, तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपलेली असून त्याचे नूतनीकरण करण्यासाठी एटीएम कार्डवरील १६ अंकांची माहिती सांगा, मोबाईलवरील मेसेजची माहिती द्या, अशा प्रकारचा तुम्हाला फोन आला की, तुमची गाठ आॅनलाईन सायबर गुन्हेगाराशी पडलेली आहे, असे समजा. अशा प्रकारच्या फोनवर विश्वास ठेवून शहरातील सुमारे पावणेदोनशे एटीएम कार्डधारक, क्रेडिट कार्डधारकांना आॅनलाईन लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची फसवणूक झालेल्या नागरिकांमध्ये उच्चशिक्षितांचाही समावेश आहे.जवळपास प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते असतेच. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील बँकांनीही मोठ्या प्रमाणात बदल करून संगणकीय प्रणालीनुसार कामकाज सुरू केले आहे. बँकेने आपल्या प्रत्येक ग्राहकास एटीएम कार्डची सुविधा दिलेली आहे. याशिवाय ग्राहकांनी आॅनलाईन बॅकिंगच्या माध्यमातून आपले व्यवहार करावेत, अशी बँकेची अपेक्षा आहे. त्यामुळे उच्चशिक्षित वर्ग आता आॅनलाईन बॅकिंगचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. यात शहरातील लोकांची संख्या अधिक आहे. मात्र आॅनलाईन बॅकिंग आणि एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर करताना सुरक्षितता न पाळल्यास तुमच्या बँक खात्यातील रक्कम कोणत्याही क्षणी सायबर गुन्हेगार आॅनलाईन ढापू शकतात.फसवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीसायबर गुन्हेगार हे रॅण्डम पद्धतीने बँक ग्राहकांना फोन करीत असतात. फोन उचलणाऱ्या व्यक्तीला तो गोड बोलून मी अमुक बँकेतून बोलत आहे. तुमच्याकडे अमुक बँकेचे एटीएम कार्ड आहे, त्या कार्डची मुदत संपलेली असून त्याचे नूतनीकरण करायचे असल्याने कार्डवरील १६ अंकांची माहिती द्या, असे सांगतो. तुम्ही ही माहिती न दिल्यास तुमचे कार्ड कायमस्वरुपी बंद होईल, अशी थापही मारतो. विशेषत: सायंकाळी आणि सकाळी प्रत्येक जण जेव्हा दैनंदिन कामकाजात गडबडीत असतो, अशा वेळी हा फोन येतो. आपले एटीएम कार्ड बंद होण्याच्या भीतीपोटी अनेक जण कार्डवरील माहिती देतात. त्या नंबरच्या आधारे भामटा कार्डचा पासवर्ड बदलत असल्याचे बँकेला कळवितो. त्यानंतर बँक ग्राहकाच्या मोबाईलवर पासवर्डच्या क्रमांकाचा मेसेज येतो, या मेसेजची माहिती हे गुन्हेगार पुन्हा फोन करून विचारून घेतात. त्या आधारे दुसरे एटीएम कार्ड बनवून फसवतात.पद्धत क्रमांक २क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून त्यांच्या ग्राहकाची पतमर्यादा ठरविण्यात आलेली असते. अशा क्रेडिट कार्ड ग्राहकांचे मोबाईल नंबर हे सायबर गुन्हेगार मिळवितात. या नंबरच्या आधारे ग्राहक कोणत्या शहरात आहेत आणि त्यांचा व्यवसाय काय हे शोधून काढतात. त्यानंतर ग्राहकाशी संपर्क साधून क्रेडिट कार्ड कंपनीचा व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून तुमचे व्यवहार चांगले असल्याने तुमची पतमर्यादा वाढविण्यात येत असल्याचे सांगतात. त्यासाठी कंपनीचा माणूस तुमच्याकडे येईल, त्यास फॉर्म भरून देऊन जुने कार्ड परत करण्याचे सांगतात. फोन करणारा माणूस खरेच क्रेडिट कार्ड कंपनीचा आहे अथवा नाही, याची शहानिशा न करताच त्याने पाठविलेल्या माणसाकडे आपले जुने क्रेडिट कार्ड देतात. या क्रेडिट कार्डवर जगभरात आॅनलाईन खरेदी करून फसवणूक केली जाते.तिजोरीचे दार उघडे ठेवाल तर चोरी होणारच - गजानन कल्याणकरसायबर गुन्हेगार हे अत्यंत चाणाक्ष असतात. ते वेगवेगळ्या मार्गाने बँक ग्राहक, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड आणि आॅनलाईन बॅकिंग करणाऱ्या लोकांची माहिती मिळवत असतात. त्यामुळे आॅनलाईन बॅकिंग करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. ग्राहकाने आपला पासवर्ड कधीही आणि कोणालाही सांगू नये. एवढेच नव्हे तर कार्ड स्वॅप करीत असताना अनोळखी व्यक्ती चोरून आपल्या पासवर्डची माहिती घेत आहे का, याबाबत सजग असावे. आॅनलाईन खरेदी करीत अथवा बिल पेमेंट करीत असताना बँकेने सांगितलेले नियम पाळावेत. नाही तर तुमची तिजोरी उघडी राहते आणि चोर त्यावर दरोडा टाकतात. त्यामुळे प्रत्येकाने आॅनलाईन व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे सायबर गुन्हे सेलचे सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.अ‍ॅड्रॉईड मोबाईलही कारणीभूूतआता जवळपास प्रत्येकाच्या हातात अ‍ॅड्रॉईड मोबाईल आहे. मोबाईलधारक आॅनलाईन पद्धतीने विविध प्रकारचे फ्री अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करीत असतात. हे अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यापूर्वी संबंधित कंपनी तुमच्या मोबाईलमधील डाटा वापरण्याची मुभा तुमच्याकडून घेत असते. तुमच्या मोबाईलमध्ये एटीएम कार्ड, आॅनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि अन्य पासवर्ड तुम्ही ह्यसेव्हह्ण करून ठेवलेले असल्यास त्याची माहिती संबंधित कंपनीकडे जाते. ही माहिती सायबर गुन्हेगारापर्यंत सहज पोहोचते.