शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अरबी समुद्रातील चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 8:00 AM

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्राचे सोमवारी सकाळी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले  आहे़.

ठळक मुद्देकोकण, गोव्यासह गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यतालक्षद्वीप व पूर्वमध्य अरबी समुद्रात रविवारी कमी दाबाचा पट्टा तयार

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्राचे सोमवारी सकाळी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले  आहे़. ते आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे़ मंगळवारी पहाटे याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे़. या चक्रीवादळाचे १२ जून रोजी तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार असून १३ व १४ जूनच्या दरम्यान ते गुजरातच्या किनारपट्टीचा धडकण्याची शक्यता आहे़. आग्नेय अरबी समुद्र, लगतचा लक्षद्वीप व पूर्वमध्य अरबी समुद्रात रविवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे़. त्याने आता आपली दिशा काहीशी बदलली असून तो गुजरातच्या दिशेने सरकत आहे़. सोमवारी सकाळी हा कमी दाबाचा पट्टा लक्षद्वीपच्या अमिनी दिवीपासून २५० किमी, मुंबईपासून ७६० किमी तर गुजरातच्या वेरावळपासून ९३० किमी अंतरावर होता़. मंगळवारी त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे़. यामुळे केरळ, कर्नाटकाची किनारपट्टी, गोवा, कोकणात ११ ते १४ जून दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. ११ जूनला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ६५ ते ७५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे़. त्यात वाढ होऊन १३ जूनला गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात वाऱ्याचा वेग ताशी ११० ते १२० किमी इतका असण्याची शक्यता आहे़. समुद्र खळवलेल्या असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे़.

........... मॉन्सूनने केरळ व्यापलामॉन्सून सोमवारी दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीपचा उर्वरित भाग, केरळचा बहुतांश भाग, तामिळनाडुचा आणखी काही भाग, आग्नेय बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, ईशान्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात तसेच मिझोरामच्या बहुतांश आणि मणिपूरच्या काही भागात दाखल झाला आहे़. गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़. अकोले ११५, राहता ६२, पुणे ४७, तुळजापूर २८,वैजापूर १६, चिपळूण १५, वैभववाडी १२,  उदगीर ६, औरंगाबाद ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. 

इशारा : ११ ते १३ जून दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे़.  

टॅग्स :PuneपुणेSea Routeसागरी महामार्गRainपाऊस