03 Jun, 20 11:39 PM
नाशिक- जिल्ह्यात कोणतेही नुकसान न करता चक्रीवादळ मनमाडच्या दिशेने पुढे सरकले.
नाशिक- जिल्ह्यात आता पर्यंत कोणतेही नुकसान न करता चक्रीवादळ मनमाडच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.
03 Jun, 20 10:24 PM
निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन ते मुंबईच्या पूर्वेला महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात ९० किलोमीटर अंतरावर शमलं, आता ते पुढे ईशान्येकडे सरकून येत्या ३ तासात त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल- हवामान विभाग
निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन ते मुंबईच्या पूर्वेला महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात ९० किलोमीटर अंतरावर शमलं, आता ते पुढे ईशान्येकडे सरकून येत्या ३ तासात त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल- हवामान विभाग
03 Jun, 20 07:12 PM
अलिबागमध्ये विजेचा खांब कोसळून एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; जिल्हाधिकारी निधी चौधरींची माहिती
03 Jun, 20 06:36 PM
मुंबईत ४६.७ मिमी पावसाची नोंद
03 Jun, 20 06:34 PM
कल्याण-शीळ रोडवरील काटई टोल नाका इथे मोठं जाहिरातीचं होर्डिंग कोसळलं
03 Jun, 20 06:22 PM
नागरिकांनी घराबाहेर पडू नये; नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचं आवाहन
03 Jun, 20 06:09 PM
पुण्यातील वेल्हा, मुळशी, खेड, जुन्नर तालुक्याला चक्रीवादळाचा फटका; अनेक गावातील झाडं उन्मळून पडली, घरं, अंगणवाड्यांचं पत्रे उडाले
03 Jun, 20 05:56 PM
नवी मुंबईच्या अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित
03 Jun, 20 05:46 PM
पुण्याच्या अनेक भागांत झाडं उन्मळून पडली; पावसाची संततधार सुरू
03 Jun, 20 05:31 PM
पालघरच्या अनेक भागांना चक्रीवादळाचा फटका; झाडं कोसळल्यानं काही प्रमाणात नुकसान
03 Jun, 20 05:21 PM
चक्रीवादळ ठाणे पट्ट्यातून पुढे सरकू लागलं; उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट
03 Jun, 20 04:57 PM
अलिबागमध्ये अनेक भागांत झाडं कोसळली; एनडीआरएफचं मदतकार्य सुरू
03 Jun, 20 04:56 PM
निसर्ग चक्रीवादळ ठाणे पट्ट्यात; उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं प्रवास सुरू
03 Jun, 20 04:30 PM
वादळाच्या स्थितीला तोंड देण्यासाठी, तात्काळ बचाव कार्य करण्यासाठी तयार राहा; मुख्यमंत्री ठाकरेंचे प्रशासनाला आदेश
03 Jun, 20 04:23 PM
वादळाचा केंद्रबिंदू मुंबई, ठाण्याच्या दिशेनं; मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात
03 Jun, 20 04:00 PM
अलिबागपासून वादळ पुढे सरकलं; सध्या वादळ मुंबईपासून ७५ किलोमीटरवर, तर पुण्यापासून ६५ किलोमीटरवर
03 Jun, 20 03:53 PM
चक्रीवादळामुळे अनेक भागांत झाडं उन्मळली; विजेचे खांब कोसळले
03 Jun, 20 03:36 PM
महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला गिरगाव किनाऱ्यावरील परिस्थितीचा आढावा
03 Jun, 20 03:33 PM
मुंबईला असलेला धोका अद्याप कायम; पुढील सहा तास अतिशय महत्त्वाचे- महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल
03 Jun, 20 03:30 PM
चक्रीवादळ पूर्ण ओसरेपर्यंत महापालिकेची यंत्रणा अखंड कार्यरत राहणार; इकबाल चहल यांची माहिती
03 Jun, 20 03:25 PM
रायगडच्या काही भागातील मोबाईल सेवेवर परिणाम
03 Jun, 20 03:19 PM
निसर्ग चक्रीवादळ डोंबिवलीमार्गे उत्तर महाराष्ट्राकडे जाणार
03 Jun, 20 03:17 PM
मुंबईत आतापर्यंत ४० हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर
03 Jun, 20 03:13 PM
अंबरनाथच्या हुतात्मा चौकात वादळामुळे झाड कोसळलं
03 Jun, 20 03:04 PM
संध्याकाळी ७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरावरील हवाई वाहतूक बंद
03 Jun, 20 02:55 PM
रायगडला चक्रीवादळाचा तडाखा; इमारतीवरील शेडचे पत्रे उडाले
03 Jun, 20 02:46 PM
नवी मुंबईच्या वाशीमध्ये झाड कोसळलं
03 Jun, 20 02:34 PM
मुंबईच्या काळाचौकी भागात झाडं कोसळल्यानं गाड्यांचं नुकसान
03 Jun, 20 02:29 PM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पश्चिम किनारपट्टीच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने बोलून माहिती घेत आहेत.
03 Jun, 20 01:58 PM
मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरील वाहतुकीला बंदी
निसर्ग चक्रीवादळामुळे वरळी सी लिंक वरील वाहतूकिला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही या मार्गाने प्रवास करू नये, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे ट्वीटद्वारे आवाहन
03 Jun, 20 01:53 PM
वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास करु नका; मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे ट्वीटद्वारे आवाहन
मुंबई : वांद्रे वरळी सी लिंक वरील वाहतूकिला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही या मार्गाने प्रवास करू नये, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे ट्वीटद्वारे आवाहन
03 Jun, 20 01:44 PM
कसा असेल निसर्ग वादळाचा पुढचा प्रवास?... सांगताहेत हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी
03 Jun, 20 01:34 PM
03 Jun, 20 01:32 PM
पुढचे तीन तास वादळ राहणार
महाराष्ट्रात चक्रीवादळ धडकलं आहे. पुढचे तीन तास हे वादळ राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
03 Jun, 20 01:32 PM
निसर्ग चक्रीवादळ रायगड, मुंबई आणि ठाणे येथून सरकणार पुढे
मुंबई: वीज आणि दूरध्वनी तसेच संपर्क साधनांच्या तारांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोठ-मोठी झाडे, उन्मळून पडण्याची, फांद्या कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
03 Jun, 20 01:24 PM
03 Jun, 20 01:20 PM
निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे, नाशिक, औरंगाबादसह अन्य जिल्ह्यात नुकसान होण्याची शक्यता
निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या पुणे, अहमदनगर, नाशिक औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात नुकसान होण्याची शक्यता आहे.
03 Jun, 20 01:18 PM
निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रातील किनारपट्टीवर धडकलं; 3 तास जोर कायम राहण्याची शक्यता
पूर्व मध्य अरबी समुद्रातले निसर्ग हे तीव्र चक्रीवादळ गेल्या सहा तासात उत्तर पूर्वेकडे ताशी 13 किलोमीटर वेगाने सरकले आहे. आज दुपारपर्यंत रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळून ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग ताशी 120किलोमीटर पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
उत्तर पूर्व अरबी समुद्र आणि दक्षिण गुजरात किनाऱ्यावर समुद्र खवळलेला राहील, 1 ते 2 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. त्याचप्रमाणे मुंबई, ठाण्यात सखल भागात पाणी साठण्याची शक्यता आहे.
03 Jun, 20 01:11 PM
निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रातील किनारपट्टीवर धडकलं
03 Jun, 20 01:07 PM
नाशिकमध्ये 2-3 वाजेनंतर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता
नाशिकमध्ये दुपारी 2-3 वाजेनंतर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस आणि वादळ घोंगावू शकते. ईगतपुरी, नाशिक, मालेगाव असे वारे वाहणार आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
03 Jun, 20 01:01 PM
मुंबई पोलिसांनी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वरळी-बांद्रा सी लिंकवरून जाण्यास वाहनांना परवानगी दिली नाही आहे.
03 Jun, 20 12:54 PM
अलिबागमध्ये वाऱ्याचा वेग वाढला
03 Jun, 20 12:44 PM
वर्सोव्यात एनडीआरएफ सज्ज; किनाऱ्यालगतच्या घरांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं
निसर्ग चक्रीवादळाच्या पाश्वभूमीवर वर्सोवा किनाऱ्यालगतच्या कच्च्या घरात राहणाऱ्या २५० नागरिकांना महापालिका बेस्ट व पोलीस यंत्रणेच्या सहाय्यानें सुरक्षित स्थळी हलवले.
प्रभाग क्रमांक ५९च्या स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, उपशाखा प्रमुख राजेश पुरंदरे तसेच गट प्रमुख रवि मेहेर आदी शिवसैनिकांसमवेत
सागर कुटीर ते वर्सोवा गांव येथील २५० कच्च्या घरातील लोकांना अंधेरी भवन्स येथील शाळांच्या आवारात हलविण्याचे काम सुरू आहे.राजेश शेट्ये यांनी ही माहिती दिली.
03 Jun, 20 12:41 PM
अजित पवारांचे नागरिकांना आवाहन
03 Jun, 20 12:31 PM
03 Jun, 20 12:30 PM
निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्याला धडकलं
निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्याला धडकल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अलिबागला काही वेळात धडकणार असून त्यानंतर उरण, पनवेलमार्गे मुंबईत धकडकण्याची शक्यता आहे.
03 Jun, 20 12:22 PM
13,541 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
रायगड जिल्ह्यातील 13,541 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
03 Jun, 20 11:39 AM
रत्नागिरीत 4 हजार नागरिकांचे स्थलांतर
निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन रत्नागिरीत 4 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
03 Jun, 20 11:14 AM
लोकांची महापालिका शाळेत राहण्याची सोय
मुंबईत माहिम खाडीला लागून राहणाऱ्या सुमारे अडीच हजार लोकांची महापालिका शाळेत राहण्याची सोय केली आहे.
03 Jun, 20 11:12 AM
दापोलीत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस
03 Jun, 20 11:22 AM
साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर
सातारा शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर, प्रतापगड, पाचगणी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाटण, महाबळेश्वर, वाई, जावळी तालुक्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
03 Jun, 20 11:12 AM
03 Jun, 20 10:44 AM
रत्नागिरीत वाऱ्याचा वेग वाढला
03 Jun, 20 10:42 AM
रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
03 Jun, 20 10:37 AM
गोव्यातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे
03 Jun, 20 10:35 AM
नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर तब्बल 11 हजार 260 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. अलिबाग 4407,पेण 87,मुरूड 2407,उरण 1512,पनवेल 55,श्रीवर्धन 2553 आणि म्हसाला याठिकाणी 239 जणांचे स्थलांतर करण्यात आले.
03 Jun, 20 10:32 AM
मुंबईच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढला
03 Jun, 20 10:26 AM
समुद्राच्या अजस्त्र लाटांशी झुंज देतेय जहाज
रत्नागिरीमध्ये मिऱ्या समुद्रात अजस्त्र लाटामध्ये अडकलेलं जहाज भरकटलं आहे. जहाजाला मिरकरवाडा बंदरात नेण्याचे प्रयत्न असफल झाल्याचे समजते. या जहाजावर काही खलाशी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
03 Jun, 20 10:04 AM
03 Jun, 20 09:57 AM
रत्नागिरीत वाऱ्याने वेग पकडला
03 Jun, 20 09:53 AM
नाशिकमध्येही सतर्कतेचा इशारा
निसर्ग चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाचा परिणाम नाशिक जिल्ह्यातील काही भागात जाणवण्याची शक्यता आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
03 Jun, 20 09:50 AM
तासागणिक निसर्ग चक्रीवादळ पुढं सरकतंय; मुंबईतही वाऱ्याचा वेग वाढला
03 Jun, 20 09:41 AM
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी पालिकेच्या सूचना
03 Jun, 20 09:30 AM
मुंबई पोलिसही सज्ज
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. लोकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन पोलीसांकडून करण्यात आलं आहे. मुंबई पोलिस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलिस दल, एनडीआरएफ, एसआरपीएफ, होमगार्डचे तैनात करण्यात आलेले आहेत.
03 Jun, 20 09:00 AM
अलिबाग १५०० लोकांचे स्थलांतर
रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये जवळपास १५०० लोकांचे स्थलांतर करण्यात आले.
03 Jun, 20 08:58 AM
चक्रीवादळाचा वेग वाढला
वाऱ्याचा वेग ताशी 85-95 किमीहून ताशी 90-100 किमी इतका वाढला, केंद्र सरकारची माहिती
03 Jun, 20 08:54 AM
उत्तन गावातील नागरिकांचे स्थलांतर
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदरमधील उत्तन गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
03 Jun, 20 08:50 AM
रत्नागिरीत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस; विद्युत प्रवाह खंडीत
रत्नागिरी : रत्नागिरी किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे आगमन झाले असून सध्या मोठ्या प्रमाणावर जाेरदार पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे.
03 Jun, 20 08:30 AM
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस
03 Jun, 20 08:26 AM
03 Jun, 20 08:26 AM
निसर्ग चक्रीवादळाने वेग पकडला
अलिबागपासून आता 140 किमी दूर, तर मुंबईपासून 190 किमी दूर अंतरावर, दुपारी 12 वाजताच चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता
03 Jun, 20 08:21 AM
03 Jun, 20 08:10 AM
03 Jun, 20 08:09 AM
'निसर्ग' चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या सज्ज
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एनडीआरएफची 20 पथकं तैनात करण्यात आली आहेत. मुंबईत आठ, रायगडमध्ये पाच, पालघरमध्ये दोन, ठाण्यात दोन, रत्नागिरीत दोन आणि सिंधुदुर्गात एनडीआरएफचं एक पथक तैनात असेल. एनडीआरएफच्या एका रेस्क्यू टीममध्ये 45 जवानांचा समावेश आहे.
03 Jun, 20 07:42 AM
03 Jun, 20 07:34 AM
रत्नागिरीतील 3 तालुक्यांना वादळाचा मोठा धोका
रत्नागिरीतील मंडणगड, गुहागर, दापोली तालुक्यास रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 4 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून आज संचारबंदीची घोषणा.
03 Jun, 20 07:30 AM
मुंबईत वाऱ्याचा वेग वाढू लागला, पहाटे 4.30 वाजता ताशी 22 कि.मी. वेग, भारतीय हवामान विभागाची माहिती
03 Jun, 20 07:29 AM
03 Jun, 20 07:17 AM
पालघरमधील समुद्रकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
03 Jun, 20 07:11 AM
अलिबागच्या किनाऱ्याजवळ एनडीआरएफच्या टीम तैनात
03 Jun, 20 07:04 AM
मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाला सुरुवात.
03 Jun, 20 04:23 AM
पुढील सहा तासांत निसर्ग चक्रीवादळ किनाऱ्यावर येऊन ठेपणार. दुपारी अलिबागजवळ वेगवान वारे वाहण्याची शक्यता.
03 Jun, 20 04:20 AM
मुंबई, पालघर, ठाणे रायगड जिल्ह्यांमध्ये दिवसभरात मुसळधार पावसाची शक्यता. उत्तर मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता.
03 Jun, 20 04:18 AM
मुसळधार पावसामुळे पुण्यातील वडगावशेरी भागात पाणी साचले. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले.
03 Jun, 20 12:27 AM
३ जूनला सीएसएमटीवरून सुटणाऱ्या विशेष ट्रेनच्या वेळापत्रकात बदल
02 Jun, 20 11:12 PM
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3 जून रोजी केवळ 12 विमानांचं आगमन होणार
03 Jun, 20 12:19 AM
मध्यपूर्व अरबी समुद्रावरील निसर्ग च्रक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे सरकले.
मध्यपूर्व अरबी समुद्रावरील निसर्ग च्रक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे सरकले.
03 Jun, 20 12:19 AM
रत्नागिरीमध्ये गेल्या तासाभरात वाऱ्याचा वेग २० वरून २४ किमी प्रति तासने वाढला.
रत्नागिरीमध्ये गेल्या तासाभरात वाऱ्याचा वेग २० वरून २४ किमी प्रति तासने वाढला.
02 Jun, 20 11:19 PM
निसर्ग चक्रीवादळामुळे उद्या मुंबई विमानतळावर केवळ १२ विमानेच उतरणार.
#CycloneNisarga - Chhatrapati Shivaji Maharaj International Airport will be operating only 12 arrival flights on June 3. The flights will be operated by 4 airlines which include Air Asia India, Air India, GoAir and SpiceJet to 10 sectors: GVK Mumbai International Airport
— ANI (@ANI) June 2, 2020
02 Jun, 20 10:45 PM
उद्या राज्यातील रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता
02 Jun, 20 10:01 PM
प्रशासन जबाबदारी घेत असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करुन सूचनांचं पालन करावं- मुख्यमंत्री
02 Jun, 20 10:00 PM
उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्री ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन
02 Jun, 20 09:51 PM
इंडिगोकडून उद्याची १७ विमानं उड्डाण रद्द
02 Jun, 20 09:39 PM
पालघरमधील २१ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवलं जाणार
02 Jun, 20 09:34 PM
चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी नौदल सज्ज; पूरपरिस्थिती हाताळण्याची पूर्ण तयारी