मुंबईः राज्यावर कोरोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचं संकटही आलं आहे. या वादळामुळे अलिबाग, रायगड, मुंबई, ठाण्याच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचणार आहे. राज्य सरकारने या संकटाचा सामना करत अनेकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दलाच्या टीम तैनात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेला सतर्कतेचा आवाहन केलं आहे. रायगड जिल्ह्यातून वादळ पुढे सरकत असून, मुंबईच्या जवळून नाशिकमार्गे उत्तर महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबई जवळून जाताना वादळाचा वेग वाढू शकतो, त्यामुळे पुढचे २-३ तास महत्वाचे आहेत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. निसर्ग वादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडलेली आहे, बऱ्याच इमारतींवरील छपरे उडून गेली आहेत. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आत्तापर्यंत जीवितहानी कुठेही झालेली नाही. परिस्थिती या क्षणापर्यंत नियंत्रणात आहे. अलिबागजवळ समुद्र किना-यावर धडकले असून, त्याचा वेग ताशी १०० - ११० किमी आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. स्थानिक प्रशासन व NDRF मदत, बचावकार्यासाठी सज्ज आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे. मी जिल्हाधिका-यांच्या संपर्कात असून प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे.
हेही वाचा
मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण
लडाख भारताचा अविभाज्य भाग, सीमेवर शांती महत्त्वाची; तिबेटच्या निर्वासित पीएमचा चीनवर हल्लाबोल
Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र
Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका