मुंबईः कोरोनासारखं हे संकटसुद्धा थोपवून त्यातून सहीसलामत नक्कीच बाहेर पडू, असा मला आत्मविश्वास आहे. आजपर्यंत जसं सहकार्य केलंत, तसंच या संकटातसुद्धा मला सहकार्य करा. आपल्या धैर्याला, हिमतीला आणि जिद्दीला मी मानाचा मुजरा करतो. संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचं आहे. हे संकट आलं तरी धैर्यानं त्याला सामोरं जायचं आहे आणि त्यातून सहीसलामत बाहेर पडू या, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. प्रशासन दक्ष असून जबाबदारी घेत आहे. स्थानिकही प्रशासनाला चांगलं सहकार्य करत आहेत. प्रशासन सांगेल त्या गोष्टींना सहकार्य करा. प्रशासन सांगेल त्या सूचनांकडे लक्ष द्या. मुख्यमंत्र्यांनी स्वत: फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. सोसाट्याचा वारा आल्यास सुरक्षित राहू शकू, असा एक भाग तयार करून ठेवा. हे वादळ उद्या दुपारच्या वेळेला धडकण्याची शक्यता आहे. शेवटी ते वादळ आहे, वादळाची दिशा आणि अंदाज आपण नाही ठरवू शकत. आता ते अलिबागला धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तिथे सज्जता आहेच. ते वादळ कुठेही धडकायला नकोच आहे. मुंबई, पालघरपासून कोकणपर्यंत संपूर्ण किनाऱ्याचा पट्टा आहे. वादळ धडकल्यानंतर ते पुढे जसजसं सरकत जाईल, तशा शासनाकडून सूचना येत राहतील. निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या समुद्रात येत असून ते ताशी १०० ते १२० किमीच्या वेगाने येत आहे. आपण सज्ज असून आर्मी, नेव्ही आणि इतर तुकड्याही तैनात आहेत. गृहमंत्री अमित शहांचा काल फोन झाला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज फोनद्वारे केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत मिळेल, असे आश्वस्त केले आहे. मात्र, पुढील दोन दिवस आपण सर्वांनी घरांमध्ये राहा, उद्या आणि परवा सर्वच कार्यालय बंद राहतील. घराबाहेर न पडणे हेच सर्वांना माझे आवाहन आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. विजेची उपकरणं चार्ज करून ठेवा अन् शक्यतो त्यांचा वापर टाळण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी जनतेला दिला आहे. नुकताच पालघर आणि समुद्रातील मच्छिमारांशी संपर्क झाला असून त्यांनाही लवकरच परत आणलं जाईल. वादळामुळे पाऊसाची दाट शक्यता असून वीजप्रवाह बंद करण्याची गरज भासल्यास तसेही करण्यात येईल, असेही ठाकरेंनी सांगितलं. अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
हेही वाचा
Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका
ठाकरे कॅबिनेटनं घेतले ६ महत्त्वाचे निर्णय, सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ
PLAचं सैन्य LAC जवळ पोहोचलं, अमेरिकेचा चीनला इशारा अन् भारताला सतर्कतेचा सल्ला
लग्नासाठी मागितलं स्वातंत्र्य; सरकारनं दिला 'क्रूर' झटका! भयानक आहे सौदीतील महिलांचं आयुष्य