सोलापूर : माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर आॅफ लेटर्स (डी. लिट) ही सन्मानाची पदवी दि. २६ एप्रिल रोजी सकाळी राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे़ कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी शनिवारी ही माहिती दिली़शिंदे यांनी कला, साहित्य, संगीत, नाट्य, सामाजिक उभारणी, राष्ट्रीय विकास तसेच सामाजिक, राजकीय सुधारणा आदी क्षेत्रांसाठी विधायक कार्य केले आहे. युवापिढीला रोजगार देणे यासारखी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. भारतातील एक मुत्सद्दी नेता म्हणून तसेच संयुक्त राष्ट्रसंघात देशाचे प्रतिनिधित्व करून त्यांनी केलेले कार्य अनमोल आहे, असे कुलगुरू मालदार म्हणाले. (प्रतिनिधी)
सुशीलकुमार शिंदे यांना डी. लिट देणार
By admin | Published: April 23, 2017 1:15 AM