ऑनलाइन लोकमतमुंबई , दि. १० : पुढें गेले हरिचे दास।त्यांची आस आम्हांसी॥त्याची मार्गी आम्हीं जाऊं।वाचे गाऊं विठ्ठला॥या अभंगा प्रमाणे समस्त वारकरी दिंड्या घेऊन पंढरपुरा कडे रवाना झालेले आहेत व त्या मागोमाग मुंबईचे डबेवाले ही आषाढी एकादशीला विठठल भेटीला पंढरपुरला जाणार आहेत.या मुळे मुंबईत दिनांक १५ व दिनांक १६ (शुक्रवार,शनिवार) या दोन दिवस जेवणाचे डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवली जाणार आहे.बहुतांश डबेवाले हे माळकरी व वारकरी आहेत पांडूरंगाचे भक्त आहेत त्यांना आषाढी एकादशीला पंढरपुरला जायचे असल्या मुळे मुंबई जेवण डबे वहातुक मंडळाने दोन दिवसाची रजा जाहीर केली आहे.
डबेवाले चालले वारीला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2016 6:17 PM