मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्ट रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात शासकीय यंत्रणा, पोलीस अपयशी ठरत आहेत. त्यामुळे गुन्हेगार मुक्तपणे फिरत आहेत. याच कारणास्तव दाभोलकर यांच्या विचारधारेवर चालणारे नेटकरी ‘#जवाब दो, #हू किल्ड दाभोलकर?’ असे हॅशटॅग वापरून शासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.दाभोलकर सोबत नसल्याची वेदना मनात आहे. दुसºया बाजूला त्यांच्या हत्येच्या तपासात प्रगती होत नसल्याने चीड आहे. तरीही दाभोलकरांचे विवेकी समाज निर्मितीचे काम पुढे नेण्याची बांधिलकी कायम ठेवून अंनिसचे हजारो कार्यकर्ते समर्पितपणे काम करत आहेत. ‘माणसाच्या शरीराला मारता येऊ शकते; मात्र त्यांच्या विचाराला मारता येणे अशक्य आहे, ते कायम अमर राहतात,’ अशी भावना संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.जनतेने शासनावर विश्वास ठेवायचा की नाही?, विचारवंताच्या हत्येचा तपास होणार की नाही?, संशयित फरार आरोपी पकडले जाणार की नाही? या प्रश्नांची उत्तरे सरकारकडून मिळण्यासाठी आणि झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी सोशल मीडियामार्फत ‘#जवाब दो, #हू किल्ड दाभोलकर?’ असे मेसेज हॅशटॅग वापरून व्हायरल होत आहेत.
दाभोलकरांचे मारेकरी मोकाट; सोशल मीडियावरून संताप व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 3:58 AM