शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

दुबार मोहराचा आंबा ठरले आकर्षण

By admin | Published: July 06, 2014 10:50 PM

लोणार तालुक्यातील नांद्रा येथे मृग बहाराचा आंबा आढळुन आला आहे

नांद्रा : फळबाग शास्त्रानुसार आंब्याला वर्षाकाठी दोन वेळा बहार येतो. आपल्या भागात मात्र, फेब्रुवारीत लागणार्‍या अंबिया बहाराची आंबेच चाखायला मिळतात. असे असले तरी लोणार तालुक्यातील नांद्रा येथे मृग बहाराचा आंबा आढळुन आला आहे. हा दुबार मोहराचा आंबा कुतूहलाचा विषय बनला असून, परिसरात आकर्षण ठरले आहे. अशा या दुर्मीळ मृग बहाराचा आंबा देणार्‍या आम्रवृक्षाचे जतन होणे आवश्यक आहे.फळाचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा त्यामध्येही गावरान आंबा दिवसेंदिवस नामशेष होत चालला आहे. आंब्याच्या झाडाला फळे दरवर्षी येत नसल्याने रसाळी व लोणचे मिळणे दुर्मिळ झाले आहे. लोणार तालुक्यातील नांद्रा येथे गावच्या पश्‍चिमेस जनाबाई कोकाटे यांच्या शेतात गावराण आंब्याचे एक झाड आहे. त्याला वर्षातून दोन वेळा आंबे येतात. या आंब्यास फेब्रुवारीमध्ये आंबिया बहार लागून त्याचे एप्रिल महिन्यात आंबे चाखायला मिळतात. तर जून महिन्यात मृग बहार लागून त्याची ऑगस्ट महिन्यात फळे चाखायला मिळु शकतात. सध्या हा आंबा मृग बहाराने फुलुन गेला असून, त्याला छोटे-मोठे आंबे सुद्धा आले आहेत. उन्हाळ्यात ह्याच आंब्याला चार हजार आंबे आले होते. आता पुन्हा हा आंबा मोहराने फुलला आहे. तो श्रावण महिन्यात पाडी लागून फळे तोडायला परिपक्व होतात. अशा प्रकारे श्रावण महिन्यात आंब्याची दुबार लज्जत चाखायला देणारा हा आंबा ह्यश्रावण्याह्ण आंबा म्हणून सुद्धा ओळखतात. कृषी विभागाने याची दखल घेवून या मृग बहारी आंब्याच्या कोयीपासून रोपे तयार करावी किंवा या आंब्याची गुटी कलम करुन या दुर्मीळ वानाचे संवर्धन व जतन करावे. असे केल्यास शेतकरी प्रोत्साहीत होतील व श्रावण महिन्यातही आंब्याची गोडी चाखायला मिळेल.