लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सराफ दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या आठ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री वडणगे (ता. करवीर) फाटा येथे अटक केली. पैशांचा पाऊस पाडतो म्हणून अनेकांना या टोळीने लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.सुधीर राचप्पा येनोळगे (५६ रा. मोरेवाडी, ता. करवीर ), गणेश बळवंत पाटील (४४, रा. वडणगे, ता. करवीर जि. कोल्हापूर), संजयकुमार रामजी शर्मा (४०, रा. फतेहपूर, उत्तरप्रदेश), सुरेंद्र बनारजी जैसवाल (३७, रा. बी-१०२, बाळकुमपाडा, ठाणे), चालक हरीश रामसाहाज शर्मा (२५, रा. हनुमान टेकडी, चाळ नं. २५, कळवा, जि. ठाणे), वासुराम रामदवर जैसवार (४३, रा. चित्रकला, जवाहरनगर चाळ, पोखरण रोड, ठाणे), हवालदार तपसी सरोज (४४, रा. सिंग इस्टेट झोपडपट्टी, रोड नं. ३, कांदिवली पूर्व, मुंबई), शशिकुमार रामजी शर्मा (३१, रा. ८४१/ए, सर्वोदयनगर, अल्लापूर, इलाहाबाद, उत्तरप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.झोपडीत पैशांचा पाऊस अन् लूटही टोळी पैसे दुप्पट करून देणे, पैशांचा पाऊस पाडणे, आदी आमिषे दाखवून लुटत होती. गणेश पाटील व सुधीर येनोळगे हे सावज हेरत होते. त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी पैसे घेऊन येणाऱ्या व्यक्तीला डोळे झाकण्यास भाग पाडत होते. टोळीतील काही सदस्य संबंधितांवर नाणी टाकून पैशांचा पाऊस पडत असल्याचे चित्र उभे करत होते. त्यानंतर पैसे घेऊन येणाऱ्या व्यक्तीला हत्याराचा धाक दाखवून आणलेली रक्कम लुबाडली जात असे. त्यासाठी त्यांनी वडणगे परिसरात झोपडी उभारली होती. पैसे उधळण्यासाठी आणलेली १, २, ५ व १० रुपयांची चिल्लर नाणी त्यांच्याकडून जप्त केली आहेत.
कोल्हापुरात दरोडेखोर टोळीला अटक
By admin | Published: June 12, 2017 2:19 AM