शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

दरोडेखोरांनी लुटून नेले नऊ कोटी

By admin | Published: June 29, 2016 6:13 AM

खासगी बँकांच्या मोठ्या ग्राहकांकडून रोकड गोळा करणाऱ्या ‘चेकमेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीवर मंगळवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला.

ठाणे : खासगी बँकांच्या मोठ्या ग्राहकांकडून रोकड गोळा करणाऱ्या ‘चेकमेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीवर मंगळवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. सात ते आठ जणांच्या टोळीने चॉपर आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तब्बल नऊ कोटी १६ लाखांची रोकड लुटली. दरोडेखोरांनी जाताना सीसीटीव्हीचे डीव्हीआर, पाच कर्मचाऱ्यांचे मोबाइल आणि एका सुरक्षारक्षकाच्या रायफलमधील काडतुसेही नेली. अत्यंत योजनाबद्धपणे झालेल्या या लुटीत कंपनीच्याच माजी कर्मचाऱ्याचा समावेश असण्याचीही शक्यता कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. आयसीआयसीआय, स्टॅण्डर्ड चार्टर्ड आदी सहा बँकांच्या रोज लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या ग्राहकांकडून रोकड जमा करण्याचे काम ‘चेकमेट’ कंपनीकडून केले जाते. पनवेल ते मुंबई आणि ठाणे परिसरातील सुमारे एक हजाराहून अधिक ग्राहकांचा त्यात समावेश आहे. त्यात मोठे मॉल्स, सराफांची दुकाने, सहकारी बँकांचाही समावेश आहे. रोज या सेंटरमध्ये किमान १४ ते १५ लाखांची रोकड जमा होते. चौथा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बँका बंद असल्यामुळे सोमवारी तब्बल २६ कोटींची रोकड जमा झाली. त्यातील ११ कोटी रकमेच्या पत्र्याच्या बॅगा स्ट्राँगरूममधून बाहेर काढण्यात आलेल्या होत्या. त्यातील नऊ कोटी १६ लाख रुपये लुटल्याची माहिती ‘चेकमेट’चे मुंबई, बांद्रा सेंटरचे व्यवस्थापक शरद शेट्टी यांनी ‘लोकमत’ ला दिली. दरोडेखोरांनी दहा, वीस, पन्नास रुपयांच्या नोटांचे गठ्ठे तसेच टाकून दिले.प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या समोरील आणि एसीसी कंपनीच्या बाजूलाच असलेल्या रस्त्यावरील ‘हिरादीप’ इमारतीमधील बेसमेंटमध्ये ‘चेकमेट’चे सेंटर आहे. पहाटे २.३० ते ३.३० वाजेच्या सुमारास तोंडावर रुमाल लावून आलेल्या आठपैकी तिघांनी आधी गेटवरील सुरक्षारक्षक रामचंद्र कोरे यांच्या पोटाला चाकू लावून बाहेर काढले. दरोडेखोरांनी माझ्या श्रीमुखात लगावली आणि कॅश सेंटरमध्ये येण्सास फर्मावल्याचे कोरे यांनी पोलिसांना सांगितले. इमारतीच्या बेसमेंटमधील सेंटरमध्ये जाण्यासाठी स्वयंचलित लॉकचा वापर केला जातो. बाहेरुन आपलेच सुरक्षारक्षक आल्याचे गनमॅन प्रकाश पवार यांनी पाहिल्यामुळे त्यांनी आतून मुख्य दरवाजा उघडला. परंतु, त्याच्या मागून आलेल्या या टोळीने आत रोकड मोजण्याचे काम करणाऱ्या १७ कामगारांना चॉपर आणि रिव्हॉल्व्हरने ठार मारण्याची धमकी देऊन एका बाजूला उभे केले. त्यातील अमोल कर्ले यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून एकाला मारल्यावर बाकीचे काम सोपे होईल, अशी त्यांच्यात चर्चा सुरू झाल्याने सारेच घाबरले होते. दरोड्यानंतर पोलिसांनी ठाणे परिसरातील रस्त्यांची नाकाबंदीही केली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. (प्रतिनिधी)>ठाणे येथील ‘चेकमेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या कार्यालयात पडलेल्या दरोड्यानंतर पोलिसांनी कार्यालयाची पाहणी केली.