शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

दादा भुसेंच्या अश्रूंनी मतपरिवर्तन झाले; शिवसैनिकांनी त्यांचे समर्थन सुरू केले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 8:31 AM

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका मांडली. त्याचवेळी दादा भुसे यांना अश्रू अनावर झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

राज्यात आणि देशभरात मागील काही वर्षांपासून ‘ईडी’ अर्थात अंमलबजावणी संचालनालय चांगलेच चर्चेत आहे. एखाद्या राजकीय नेत्याला ईडीची नोटीस आली की समस्त राजकीय वातावरण तापते. मग केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करून दबाब टाकत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातो. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ईडी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्तापरिवर्तनासाठीदेखील ईडीच्या कारवाईचा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप राज्यातील आत्ताच्या विरोधकांकडून केला जात आहे. याबाबतचे अनेक मीम्स आणि विनोद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या व्हायरल संदेशातील ईडी म्हणजे ‘अंमलबजावणी संचालनालय’ नव्हे, तर ‘इ’ म्हणजे नवनियुक्त मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे’ आणि ‘डी’ म्हणजे उपमुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ असा आहे.  या पोस्टमध्ये दोघांचे फोटो वापरण्यात आले असून, हा मनोरंजनाचा विषय ठरत आहे. 

‘ना रहेगा बास ना रहेगी बांसुरी’...राज्य शासनाने १ जुलैपासून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात एकल प्लास्टिक वापरास पूर्णत: बंदी घातली  आहे. हा निर्णय नागरिकांच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. त्याचे समाजातून स्वागतच व्हायला हवे, यात शंका नाही. बंदीमुळे पर्यावरणाची हानी टळेल, असा विश्वास आहे. शासनाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकल प्लास्टिक वापरणाऱ्यावर कारवाईदेखील सुरू  केली आहे. परंतु, ज्या ठिकाणी हे प्लास्टिक निर्माण होते, ते कारखाने अजूनही सुरू असल्याने शासनाच्या आदेशाला किती महत्त्व आहे, यावर समूहात चर्चा सुरू होती. बंदी नंतरही हे कारखाने सुरू असतील तर प्लास्टिक वापर बंद होईल कसा अशी चर्चा सुरू असताना एकाने एकीकडे बंदी घालायची अन् कारखाने सुरूच ठेवायचे या धोरणावर टीका केली. शासनाने कारवाई करण्यापेक्षा या फॅक्टरीच बंद केल्या तर ‘ना रहेगा बास ना रहेगी बासुरी’... असे त्याने म्हणताच एकच हशा पिकला.

ताई आल्या, लाटल्या पुऱ्या !राजकीय लोकांचा अनुनय करणे सोपे नसते, मात्र राजकीय व्यक्ती लोकानुयन करू शकतात. लोकांमध्येच त्यांचा वावर असल्यामुळे ही कला आत्मसात करणे राजकारण्यांसाठी आवश्यकही असते. त्याचमुळे कधी लग्न समारंभात फेर धरणे असो वा कीर्तन, भजनात टाळ वाजविणे, या साऱ्या बाबी राजकीय व्यक्ती लिलया करतात. अर्थात हे सारे करण्यामागे राजकीय व्यक्तीही हौस तर असतेच परंतु त्यामागे काही ना काही स्वार्थही दडलेला असतो. परंतु सामान्य व्यक्तींसाठी हे सारे अप्रुप असते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यादेखील अशाच कारणावरून चर्चेत आल्या आहेत. एरव्ही कामाच्या व्यापामुळे सार्वजनिक समारंभांना उपस्थित राहणे अवघड होत असल्यामुळे जसा वेळ मिळेल तसा त्याचा उपयोग करून घेण्यात ताई यांचा हातखंडा. त्यामुळे चांदवड दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी देनेवाडी येथील शेतकऱ्याच्या घरी कन्येच्या विवाह सोहळ्याची लगीन घाई सुरू असल्याने ताईंनी थेट शेतकऱ्याचे घर गाठले. नववधूला शुभाशीर्वाद तर त्यांनी दिलेच, परंतु लग्न घरी महिला मंडळी पुऱ्या लाटत असल्याचे पाहून ताई यांच्यातील स्त्री जागृत झाली व त्यांनी पदर खोचून जमिनीवरच ठाण मांडून पुऱ्या लाटायला सुरुवात केली. केंद्रीयमंत्री चक्क लग्न समारंभात पुऱ्या लाटत असल्याचे वृत्त पंचक्रोशीत पसरले. आता ताईंनी लाटलेल्या पुऱ्या कोणाच्या नशिबात त्यावर चर्चा झडू लागली.

दादा भुसे यांच्या अश्रूंनी मतपरिवर्तन झालेराज्यातील सत्तांतरात नाशिकच्या दोन आमदारांनी मोलाचा वाटा उचलला. त्यात माजी कृषिमंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांचा समावेश होता. दादा भुसे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यानंतर मालेगावमधील शिवसैनिकांची आणि समर्थकांची नक्की भूमिका काय हेच कळेनासे झाले होते. अनेकांना तर काय भूमिका घेऊ हे कळत नव्हते. मात्र, दादा भुसे यांनीच हा प्रश्न जणू सोडवला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका मांडली. त्याचवेळी दादा भुसे यांना अश्रू अनावर झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. तो मालेगावमधील एका व्हॉट्स ॲपग्रुपवरदेखील आला. दादा भुसे यांनी जी भूमिका घेतली ती आपल्यासाठीच घेतली, बघा दादांना अश्रू अनावर झाले अशा टिप्पणी करीत त्यांचे समर्थन सुरू केले आणि केवळ दादांच्या अश्रुंमुळे अनेकांची भूमिका निश्चित झाली.