शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

दादा- राजेंच्या वादाला ‘बाबां’ची ठिणगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2017 10:22 PM

बारामतीला शह देण्यासाठी : ‘सातारा अन् कऱ्हाड’ एकत्र

सातारा : राज्यातील तीन महत्त्वांच्या राजकीय नेत्यांचं त्रांगडं सध्या सातारकरांना पाहावयास मिळू लागलंय. राष्ट्रवादीचे खासदार असूनही पक्षाच्याच विरोधात आपले उमेदवार उभे करणाऱ्या उदयनराजेंना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठिंबा दिल्यामुळे अजितदादा आणि उदयनराजे यांच्यातील वादात ठिणगीच पडलीय. सातारा तालुक्यात जिल्हा परिषदेचे दहा गट अन् पंचायत समितीचे वीस गण असून, जवळपास प्रत्येक ठिकाणी उदयनराजेंच्या ‘राजधानी एक्सप्रेस’चे स्वतंत्र डबे जोडले गेलेत. मात्र केवळ नागठाणे गट-गण वगळता इतर ठिकाणी काँग्रेसने आपला एकही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात उदयनराजेंच्या उमेदवारांना काँग्रेसची साथ मिळणार, हे जवळपास स्पष्ट झाल्यानं नव्या समीकरणांना वेग आलाय. बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आपला विरोध असल्याचे खासदार उदयनराजे सांगत असले तरी त्यांच्या स्वतंत्र आघाडीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी पक्षालाच बसतोय. अशातच त्यांना पृथ्वीराज बाबांची साथ मिळाल्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांची खदखद वाढत चाललीय. सातारा तालुक्यात भाजपनेही आपले उमेदवार उभे केले असले तरी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पक्षाच्याच खासदारांविरुद्ध कडवा संघर्ष करण्याची वेळ आलीय. (प्रतिनिधी)शत्रूचा शत्रू तो आपला मित्र...सातारा जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांना उघडपणे विरोध करण्याचं कार्य उदयनराजेंनी केलंय. राज्याच्या राजकारणातही गेल्या अडीच वर्षांपासून अजितदादा अन् पृथ्वीराज बाबा यांच्यात विस्तू गेल्याचं ऐकिवात नाही. तसेच एकमेकांचे साडू असणारे रामराजे नाईक-निंबाळकर अन् पृथ्वीराज बाबा हेही सातारा जिल्ह्यात एकमेकांना नेहमीच पाण्यात पाहत आलेत.या पार्श्वभूमीवर उदयनराजे अन् पृथ्वीराज बाबा यांची छुपी आघाडी अजितदादा अन् रामराजेंसाठी धोकादायक बनतेय.